सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला 5 वर्ष पूर्ण, पण अभिनेत्याची महत्त्वाची गोष्ट कोणाला माहितीच नाही!
Sushant Singh Rajput: सुशांत सिंग राजपूत याच्या निधनाला आज 5 वर्ष पूर्ण झाली आहेत, पण अभिनेत्याबद्दल 'ही' महत्त्वाची गोष्ट फार कोणाला माहितीच नाही..., मृत्यूनंतर देखील सुशांत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतो चर्चेत...

Sushant Singh Rajput: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्याच्या निधनाला आज 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण आजही अभिनेत्याला चाहते विसरु शकलेले नाहीत. सोशल मीडियावर देखील अभिनेत्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. चाहते आजही अभिनेत्याला विसरु शकलेले नाहीत. आजही सुशांतच्या आठवणीत त्याचे सिनेमे चाहते ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहत असतात.
सुशांत याच्या करीयरबद्दल सांगायचं झालं तर, 2013 मध्ये अभिनेत्याने ‘काय पो चे’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अभिनेत्याला टीव्ही क्वीन एकता कपूर हिने मालिकेत संधी दिली होती. ‘पवित्र रिश्ता’ हिच सुशांतची पहिली मालिका आहे. असं सर्वांना माहिती आहे. पण ‘किस देश में है मेरा दिल’ या मालिकेतून सुशांतने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.
‘किस देश में है मेरा दिल’ मालिकेत सुशांतला भूमिका कशी मिळाली? असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. इंजीनियारिंगचं शिक्षण घेण्यासाठी सुशांत दिल्लीत आला आणि त्यानंतर मुंबईत अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी आला. दिल्लीत असतानात एका डान्स अकॅडमीत सुशांतने प्रवेश घेतला.
2005 मध्ये सुशांतला डान्स ग्रुपसोबत मुंबईत येण्याची संधी मिळाली. रिपोर्टनुसार, एकता कपूर ‘किस देश में है मेरा दिल’ मालिकेसाठी ऑडिशन घेत होती. जेथे सुशांत पोहोचला. पहिल्याच राऊंडमध्ये एकताला सुशांतचं काम प्रचंड आवडलं. त्यानंतर एकता कपूर हिने सुशांतची ‘पवित्र रिश्ता’ मालिकेसाठी मुख्य अभिनेता म्हणून निवड केली. त्यानंतर सुशांत याने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
2011 पर्यंत सुशांत याने ‘पवित्र रिश्ता’ मालिकेसाठी काम केलं. त्यानंतर अभिनेत्याने स्वतःचा मोर्चा बॉलिवूडच्या दिशेने वळवल. अभिनेत्याने ‘काय पो चे’ सिनेमानंतर ‘एमएस धोनी: अनटोल्ड स्टोरी’, ‘राबता’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारखे हीट सिनेमे बॉलिवूडला दिले.
सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचं नाव ‘दिल बेचारा’ होतं. अभिनेच्याच्या मृत्यूनंतर सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. 14 जून 2020 मध्ये सुशांत याने स्वतःला संपवलं. पण आजही अभिनेता चाहत्यांच्या आठणीत आहे.
