Maharashtra Election News LIVE : सुनेत्रा पवारांकडून चैत्यभूमीवर अभिवादन
Live Updates In Marathi : आजपासून बारावीच्या परीक्षा सुरू होत असून या परीक्षेसाठी 10 हजार 664 शाळा आणि कनिष्ठ विद्यालयातील 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 27 हजारांनी वाढली आहे. परीक्षेच्या काळात कॉपी होऊ नये यासाठी 271 भरारी पथके तैनात केली आहेत.

LIVE NEWS & UPDATES
-
अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत रोहित पवार आज घेणार पत्रकार परिषद
बारामती येथील दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. आता या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. या अपघाताबाबत राजकीय वर्तुळातून अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. त्यातच आता रोहित पवार यांनी आज मंगळवारी दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही पत्रकार परिषद पार पडणार आहे.
-
शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे विजय वडेट्टीवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल…
शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे विजय वडेट्टीवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. महापौर पदाच्या उमेदवाराच्या निवडीसाठी उरला अवघा दीड तास आहे. असं असताना चंद्रपूर मधील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आलाय.
-
-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत नाशिक दौऱ्यावर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत नाशिक दौऱ्यावर आहेत. चांदवड तालुक्यातील जैन धर्मियांच्या पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवात दुपारी 3 वाजता पंचपरमेष्ठी मंडपमचे उद्घाटन त्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी मोहन भागवत हे उपस्थितांना मार्गदर्शन देखील करणार आहेत.
-
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चैत्यभूमीवर दाखल; बाबासाहेबांना अभिवादन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चैत्यभूमीवर दाखल झाले. बाबासाहेबांना अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाल्या आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
-
ठाण्यातील युवा सेना कार्यकारणी सदस्य सिद्धेश अभंगे यांना जीवे ठार मारण्यासाठी आलेल्या 2 आरोपींना अटक
ठाण्यातील युवा सेना कार्यकारणी सदस्य सिद्धेश अभंगे यांना जीवे ठार मारण्यासाठी आलेल्या दोन सराईत आरोपींना कोपरी पोलीस ठाणे यांनी शिताफीने अटक केली. पोलिसांना आरोपींच्या बॅगेतून धारदार चाकू आणि काही हत्यारं सापडली आहेत. जीवे मारण्याचा कट कोणी आणि कशासाठी रचला याचा पुढील तपास कोपरी पोलीस करत आहेत. शिवसेनेत सिद्धेश अभंगे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात.
-
-
मंत्रालयाचा सहावा मजला सुनेत्रा पवार यांच्या स्वागतासाठी सज्ज
मंत्रालयाचा सहावा मजला सुनेत्रा पवार यांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. कुंड्या लावून बाहेरचा परिसर स्वच्छ करण्यात आला. ९.३० वाजता सुनेत्रा पवार मंत्रालयात दाखल होणार आहेत, त्यापूर्वी त्या मुंबईतील सिद्धिविनायक आणि चैत्यभूमीला भेट देणार आहेत. यानंतर त्या विधान भवनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मंत्रालयात कार्यालयात पदभार स्वीकारणार आहेत.
-
धाराशिव जिल्हा परिषदेत दोन मोठे विजय, एकाच तालुक्यातून दोन मोठे विजय
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत कवठा गटातून युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी विक्रमी विजय मिळवला आहे. देशमुख तब्बल ५,५७० मतांनी विजयी झाले असून मराठवाड्यातील हा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. तर दुसरीकडे उमरगा तालुक्यातील कदेर जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड यांनीही दमदार कामगिरी करत ६,२९० मतांनी विजय मिळवला आहे.
-
-
चंद्रपूर- भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाचा अपघात
चंद्रपूर- भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या ताफ्यातील पोलीस वाहन ओव्हरटेक करताना त्याने दुसऱ्या वाहनाला धडक दिली. या धडकेत कुणालाही दुखापत झाली नाही. ही घटना आमदार जोरगेवार रात्री नागपूरहून येत असताना चंद्रपूर जवळील मोरवा या गावाजवळ झाली.
-
नाशिक – ठाकरेंच्या शिवसेनेत विरोधी पक्ष नेतेपदावरून स्पर्धा
नाशिक – ठाकरेंच्या शिवसेनेत विरोधी पक्ष नेतेपदावरून स्पर्धा सुरू आहे. पंधरा नगरसेवकांपैकी पाच नगरसेवकांमध्ये चुरस रंगली असून विरोधी पक्षनेत्याचा निर्णय मातोश्री वरून होणार आहे. पक्षाच्या संकट काळात जो सोबत, त्यांना प्राधान्य दिलं जाणार असल्याची चर्चा आहे.
-
भाजपच्या तोडीस तोड आमच्या जागा आल्या, जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष झाला तर आनंदच- राजन साळवी
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीनंतर अध्यक्षपदावरून सत्तासंघर्ष रंगण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या करेक्ट नियोजनामुळे भाजपच्या तोडीस तोड जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत, जिल्हा परिषद अध्यक्षपदावर शिवसेनेचा दावा असल्याचं स्पष्ट संकेत शिवसेना संपर्कप्रमुख राजन साळवी यांनी दिले आहेत. “जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष झाला, तर मला आनंदच होईल,” असं ठाम मत राजन साळवी यांनी व्यक्त केलं आहे. या भूमिकेमुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
आजपासून बारावीची परीक्षा सुरू; कॉपी होऊ नये यासाठी 271 भरारी पथके तैनात
आजपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेसाठी 10 हजार 664 शाळा आणि कनिष्ठ विद्यालयातील 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 27 हजारांनी वाढली आहे. परीक्षेच्या काळात कॉपी होऊ नये यासाठी 271 भरारी पथके तैनात करण्यात आली आहे.
-
सुनेत्रा पवार आज औपचारिकरित्या स्वीकारणार पदभार
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार आज औपचारिकरित्या पदभार स्वीकारणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीस देखील उपस्थित राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयालाही भेट देणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे मंगळवारपासून (10 फेब्रुवारी) राज्यभरात बारावीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेसाठी 10,664 शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतील 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीची विद्यार्थीसंख्या सुमारे 27 हजारांनी वाढली आहे. परीक्षेच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठी 271 भरारी पथकांसह अन्य काटेकोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार आज औपचारिकरित्या पदभार स्वीकारणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीस देखील त्या उपस्थित राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयालाही भेट देणार आहेत. यासह राज्य, देश-विदेशातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Feb 10,2026 8:23 AM
