AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मणिपूरमध्ये मोठी आणि भयंकर ट्रॅजेडी, 15 जणांचा मृत्यू, 180 हून अधिक जणांवर उपचार; सर्वच हादरले!

मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात विषारी दारूमुळे मोठी दुर्घटना घडली आहे. मेथनॉल पॉयझनिंगमुळे आतापर्यंत 15 लोकांचा मृत्यू झाला असून, 180 हून अधिक जण गंभीर आजारी आहेत. इंफाळच्या शिजा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

मणिपूरमध्ये मोठी आणि भयंकर ट्रॅजेडी, 15 जणांचा मृत्यू, 180 हून अधिक जणांवर उपचार; सर्वच हादरले!
Manipur Liquor Crisis Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 20, 2026 | 11:24 PM
Share

मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात मोठं संकट आलं आहे. विषारी दारू प्यायल्याने तीन दिवसात आतापर्यंत 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 180 जण आजारी पडले असून त्यांच्यावर इंफाळच्या शिजा हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूमध्ये उपचार सुरू आहेत. चंदेल जिल्ह्यातील चाकपी कारोंगमध्ये स्थानिक ठिकाणी बनलेली दारू प्यायल्याने ही घटना घडली आहे. मेथनॉल पॉयजनिंगमुळे ही घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

विषारी दारूमुळे आजारी पडलेले आणि मृत्यूमुखी पडलेले बहुतेक लोक हे चंदेल जिल्ह्यातील चाकपी कारोंग येथील राहणारे आहेत. यात तरुणांपासून वयस्कांचा आणि बुजुर्गांचाही समावेश आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या लोकांमध्ये मेथनॉल पायजनिंगचे लक्षण आढळून आले आहे. हा विषारी पदार्थ दारूत मिसळलेला होता. तो प्यायल्याने लोक आजारी पडले. त्यामुळे त्यांना तात्काळ शिजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील काहींची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. या रुग्णालयात रुग्णांची रिघ लागली आहे. सतत रुग्ण येत असल्याने रुग्णालय प्रशासनावरही ताण आला आहे. दारूची विषबाधा झालेल्या लोकांना घेऊन आणखी एक बस रुग्णालयात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस

मणिपूरचे मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनी घटनेची माहिती मिळताच शिजा रुग्णालयात जाऊन माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी रुग्णांची विचापूस केली असून डॉक्टरांच्या टीमकडून उपचाराची माहिती घेतली आहे. यावर शिजाचे ज्वॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. चेतन हुंडोंगबाब यांनी मीडियाशी संवाद साधला. आज रुग्णालयात रुग्ण येण्यापूर्वी चंदेज जिल्ह्यात विषबाधा झाल्याची आम्हाला आधीच माहिती मिळाली होीत. जेव्हा रुग्ण रुग्णालयात आले तेव्हा हे मेथनॉल पायजनिंगचं प्रकरण असल्याचं आमच्या लक्षात आलं. आतापर्यंत आमच्याकडे 180 रुग्णा आले आहेत. यात एकाचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला मृतावस्थेतच रुग्णालयात आणण्यात आलं होतं, अस हुंडोंगबाम यांनी सांगितलं.

आरोग्य विभागाकडे मदतीची मागणी

अजून तीन रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांचं हिमोडायलिसिस करण्यात येत आहे. आमच्याकडे बेड तयार होते, ते रुग्णांनी भरून गेले आहेत. आम्ही राज्य आरोग्य विभाग, RIMS आणि GENIMS कडून रुग्णांच्या उपचारासाठी मदत मागितली आहे. आम्ही रुग्णांना दुसऱ्या केंद्रात पाठवणार आहोत. ज्या रुग्णांची तब्येत गंभीर आहे, ज्यांना लाइफ सपोर्ट सिस्टिम वा हिमोडायलिसिसची गरज आहे, त्यांच्यावर आम्ही इथेच उपचार करणार आहोत. राज्य आरोग्य विभागाकडून सर्वोतोपरी मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचंही हुंडोंगबाम यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर