AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळ्या नागाचा पायाला घट्ट विळखा, चावला नाही, तरीही तरुणाचा मृत्यू; विचित्र घटनेने डॉक्टरही हैराण

उत्तराखंडमध्ये एका तरुणाच्या पायाला काळ्या नागाने विळखा घातला, पण चावला नाही. तरीही तो तरुण अचानक कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी साप चावला नसल्याचे स्पष्ट केले, त्यामुळे मृत्यूचे कारण एक गूढ बनले आहे. भीतीने हृदयविकाराचा झटका आला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे ही घटना अधिक विचित्र ठरली आहे.

काळ्या नागाचा पायाला घट्ट विळखा, चावला नाही, तरीही तरुणाचा मृत्यू; विचित्र घटनेने डॉक्टरही हैराण
Black SnakeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 19, 2026 | 1:07 PM
Share

उत्तराखंड येथे एक विचित्र घटना घडली आहे. किच्छा येथे राहुल काश्यप हा तरुण ड्युटीवर तैनात होता. रस्त्यातून जात असताना अचानक एक काळा नाग राहुलच्या पायाला चिपकला. त्याने त्याच्या पायाला विळखा घातला. त्यामुळे हा राहुल भयंकर घाबरला होता. त्याने या सापावर विटाने वार केला आणि त्याला पळवून लावलं. त्यानंतर राहुलची तब्येत अचानक बिघडली. तो बेशुद्ध पडून खाली कोसळला. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्याला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केलं. मात्र, साप चावल्याने राहुलचा मृत्यू झाला नसल्याचं डॉक्टर म्हणाले. राहुलला साप चावला नाही तर मग त्याचा मृत्यू झाला कसा? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

उत्तर प्रदेशातील पीलीभीतमधील बिसलपूरच्या मोहल्ला दुर्गा प्रसाद येथे राहुल काश्यप राहतो. त्याचा असा विचित्र पद्धतीने मृत्यू झाल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल हा उत्तराखंडच्या किच्छा येथून ड्युटीवर जायला निघाला होता. त्यावेळी एका काळ्या नागाने त्याच्या पायाला विळखा घातला. अचानक नागाने विळखा घातल्याने राहुल प्रचंड घाबरला होता. त्याने स्वत:चा बचाव करण्यासाठी नागाला हुसकवण्याचा प्रयत्न केला. त्याने नागावर विटांनी वारही केले. त्यानंतर काळा नाग तिथून निघून गेला.

अचानक तब्येत बिघडली

नागाने राहुलला चावा घेतला नाही. तो निघून गेला. त्यामुळे सर्वांनाच हायसं वाटलं. पण काही वेळाने राहुलची तब्येत बिघडण्यास सुरुवात झाली. तो बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. आसपासच्या लोकांनी त्याला लगेचच रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला मृत घोषित केलं. राहुलच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सस्पेन्स वाढला

राहुलच्या कुटुंबीयांनी धक्कादायक माहिती दिली आहे. राहुलला नाग चावला नव्हता. त्यामुळे त्याचा मृत्यू नाग चावल्याने झाला नाही, असं डॉक्टरांनी सांगितल्याचं राहुलच्या कुटुंबीयांनी सांगितलं. त्यामुळे राहुलला जर नाग चावला नाही तर मग त्याचा मृत्यू झाला कसा? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र, राहुलच्या मृत्यूचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

अंतिम संस्कार आणि शोक

राहुलचा मृतदेह बिसलपूर येथील त्याचा मूळ गावी आणण्यात आलं. त्याची डेडबॉडी आली तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी एकच आकांत केला. संपूर्ण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. काल संध्याकाळीच दु:खी वातावरणात त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. नागाने पायाला विळखा घातल्यानंतर राहुल प्रचंड घाबरला होता. त्यामुळे त्याच्या हृदयाचे ठोके अधिक वेगाने वाढले असतील. त्यामुळे त्याला हार्ट अटॅक येऊन त्याचा मृत्यू झाला असावा, असं सांगितलं जात आहे.

Follow Us
दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना
Dadar : दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना वेग!
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकर
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकरांचा थेट कोर्टात खेचणार असा इशारा!
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! PM नरेंद्र मोदी यांनी सांगितले...
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले कर सुधारणांचे फायदे
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा थेट पुरावे दाखवत दावा
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी नको, कारवाई करा! शायना एनसी...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी नको, कारवाई करा! शायना एनसी यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक
पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारलं थेट...
Sanjay Raut : पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारला नेमका प्रश्न...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय विरोधकांना थेट इशारा
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाहांना पत्र
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाह आणि राहुल गांधींना पत्र!
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची...
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय...
CM Fadnavis On Water Scarcity : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय