AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंगाचा थरकापच उडतो… या रस्त्यावर येतात शेकडो साप, रोडच होतो बंद; जाणारेही टरकतात

अमेरिकेतील इलिनोईस राज्यातील 'स्नेक रोड' वर्षातून चार महिने बंद असतो. या रस्त्यावर शेकडो साप आणि इतर वन्यजीव स्थलांतर करतात. त्यांच्या जीवांना धोका होऊ नये म्हणून हा रस्ता बंद ठेवला जातो. डोंगराळ आणि दलदलीच्या भागांदरम्यान सापांचे हे स्थलांतर होते. त्यामुळे अनेकांना थरकाप भरणारा हा रस्ता जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

अंगाचा थरकापच उडतो... या रस्त्यावर येतात शेकडो साप, रोडच होतो बंद; जाणारेही टरकतात
Snake Road IllinoisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 19, 2026 | 12:07 PM
Share

साधारणपण रस्त्यावरून वाहनांची ये-जा होत असते. त्यामुळे रस्त्यावर चिटपाखरूही फिरकत नाही. मग जनावरांची बातच वेगळी. पण तुम्ही कधी केवळ सापांमुळे रस्ता बंद केल्याचं ऐकलंय का? अमेरिकेत असा एक रोड आहे, जिथे शेकडो साप रस्त्यावर येतात. त्यामुळे वर्षातून चार महिने हा रस्ताच बंद करावा लागतो. वाहनांना नो एन्ट्री असते. या रस्त्यावरून गाड्या चालवल्या तर साप चिरडण्याची शक्यता असते. तसेच एखाद्याच्या जीवावरही बेतण्याची शक्यता असते त्यामुळे हा रस्ता बंद केला जातो. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर सापच साप पाहून अनेकांचा थरकाप उडतो. काही लोक तर या परिसरात यायलाही टरकतात.

अमेरिकेच्या इलिनोइस राज्यातील शॉनी नॅशनल फॉरेस्टमधून हा रस्ता जातो. या रस्त्याला स्नेक रोड असं नाव देण्यात आलं आहे. या रस्त्याचं अधिकृत नाव फॉरेस्ट सर्व्हिस रोड 345 आहे. सुमारे चार किलोमीटर रस्त्याला ला-रू रोड असंही म्हटलं जातं. या रस्त्याच्या बाजूला चुन्याचे दगड असून हा दलदलीचा भाग आहे. या संपूर्ण परिसरात सापांशिवाय इतर अनेक वन्यजीव आहे. हवामान बदलताच या जीवांचं ठिकाणही बदलतं.

रस्ता बंद का होतो?

या भागात असणारे साप आणि इतर जीव वर्षातून दोनदा आपलं ठिकाण बदलतात. थंडीच्या दिवसात हे जीव चुन्याच्या दगडावर किंवा डोंकरावर जातात. सुरक्षित राहण्यासाठी ते हा पर्याय निवडतात. उन्हाळ्यात हे जीवजंतू दलदलीकडे जातात. त्यानंतर पुन्हा हिवाळ्यात ते डोंगरावर जातात. या दोन्ही ठिकाणाच्या मधोमध रस्ता आहे. हा रस्ता पार करूनच त्यांना आपल्या इच्छित स्थळी जावं लागतं. साप आणि इतर जीव त्यामुळेच रस्ता पार करण्यासाठी रस्त्यावर येतात. मोठ्या प्रमाणावर साप रस्त्यावर येत असल्याने गाडीखाली येतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळेच अमेरिकेच्या वन विभागाने हा रस्ता वर्षातून दोनदा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

वर्षातून कितीवेळी बंद?

स्नेक रोड वर्षातून दोन महिने दोन दोन महिन्यासाठी बंद करावा लागतो. म्हणजे एकूण चार महिने हा रस्ता बंद असतो. या ठिकाणी कोणतीच ये जा होत नाही.

दोन वेळा ठरवल्या

पहिल्यांदा : 15 मार्च ते 15 मे पर्यंत रस्ता बंद असतो. यावेळी जीवजंतून डोंगराळ भागातून निघून दलदलीकडे जात असतात.

दुसऱ्यांदा : 1 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबरपर्यंत रस्ता बंद असतो. यावेळी पुन्हा दलदलीकडून डोंगराळ भागाकडे हे जीवजंतू जात असतात.

अशा पद्धतीने वर्षातून आठ महिने रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. मात्र, जेव्हा रस्ता बंद असतो तेव्हा या भागात कुणालाही प्रवेश दिला जात नाही. कोणी या भागात फिरकणार नाही याची काळजी घेतली जाते.

Follow Us
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा थेट पुरावे दाखवत दावा
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी नको, कारवाई करा! शायना एनसी...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी नको, कारवाई करा! शायना एनसी यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक
पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारलं थेट...
Sanjay Raut : पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारला नेमका प्रश्न...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय विरोधकांना थेट इशारा
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाहांना पत्र
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाह आणि राहुल गांधींना पत्र!
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची...
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय...
CM Fadnavis On Water Scarcity : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे...
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे लोक... जरांगे पाटील स्पष्टच बोलले
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी बैठकीत...
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत!
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक प्रकार