IND vs NZ: पडिकलकडून एक मोठी चूक अन् सगळंच चित्र पालटलं, गिल अन् पंतलाही राग अनावर
Devdutt Padikal Drop Catch: भारत न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे, या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी देवदत्त पडिकलकडून मोठी चूक घडली आहे.

IND vs NZ 1st Test: हेन्री निकोल्सने भारताविरुद्धच्या पहिल्या डावात एक शानदार शतक झळकावले. हे विशेष महत्त्वाचे होते कारण न्यूझीलंडने अवघ्या ७० धावांत पाच गडी गमावले होते. त्याची विकेट घेण्यासाठी आतुर झालेल्या भारतीय संघाला त्याला बाद करण्याची चांगली संधी मिळाली होती, पण देवदत्त पडिक्कलने झेल सोडला. त्यावेळी निकोल्स १०२ धावांवर खेळत होता. भारतीय कर्णधार शुभमन गिलदेखील या सुटलेल्या झेलमुळे नाराज झाला होता. ऋषभ पंतही संतापलेला दिसत होता, तो झेल घेण्यासाठी मागे धावला.
७४ व्या षटकाचा तिसरा चेंडू प्रसिद्ध कृष्णाने बॅक-ऑफ-लेंथ टाकला आणि हेन्री निकोल्सने पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा शॉट चुकला. चेंडू हवेत उडून शॉर्ट फाइन लेगच्या दिशेने गेला. यष्टीरक्षक ऋषभ पंत झेल घेण्यासाठी मागे धावला. शॉर्ट फाइन लेगला उभ्या असलेल्या देवदत्त पडिक्कलसाठी तो एक सोपा झेल होता, पण तो त्याच्या हातून निसटला.
Even ian smith mentioned that if this hippo pulled early then dev might have taken that catch…
What have you done liability pant💔 https://t.co/YTlJpmHQGw
— MR.LORD✨️ (@LORD__GAMERR__1) November 19, 2026
झेल घेण्याच्या प्रयत्नात पडिक्कलच्या जवळ पोहोचलेला ऋषभ पंत, या सुटलेल्या झेलमुळे खूप नाराज दिसत होता. तो पडिक्कलशी बोलतानाही दिसला, मात्र तो काय म्हणाला हे स्पष्ट नाही. त्यानंतर कर्णधार शुभमन गिल झेल सोडल्यामुळे संतापलेला दिसत होता. होन्री मैदानात बराच वेळा टिकून होता.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात टॉम लॅथमला बाद करून धडाकेबाज सुरुवात केली, त्यानंतर न्यूझीलंडने अवघ्या ७० धावांत पाच विकेट गमावल्या. मग, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हेन्री निकोल्ससोबत ग्लेन फिलिप्स यांनी मैदानावर जम बसवला; दिवसाचा खेळ संपेपर्यंत या जोडीला एकही विकेट मिळाली नाही. निकोल्सने शतक झळकावले, आणि फिलिप्स शतकापासून सहा धावा दूर आहे.
हेन्री निकोल्स आणि ग्लेन फिलिप्स यांनी आतापर्यंत १७३ धावांची भागीदारी केली आहे. हेन्री ११३ धावांवर आणि फिलिप्स ९४ धावांवर नाबाद असून, त्यांच्यामुळे दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा डाव २४३/५ पर्यंत पोहोचला आहे.
