Shubman Gill Angry Video: भर सामन्यात गिलला राग अनावर, थेट अंपायरच्या अंगावर धावून गेला, घडलं तरी काय?
Shubman Gill Angry On Umpire: भारतीय कर्णधार शुभमन गिल अंपायवर संतापलेला पाहायला मिळाला. पहिल्याच सामन्यात असं काय घडलं पाहा व्हिडिओमध्ये.

IND vs NZ 1st Test Match: वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. १९ नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी, भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गिलचा निर्णय योग्य ठरला, कारण भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात न्यूझीलंडच्या चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीनंतर लगेचच पाचवी विकेट पडली. पाचवी विकेट पडल्यानंतर ग्लेन फिलिप्स क्रीजवर आला. तोही जवळपास बादच झाला होता. मात्र, तिसऱ्या पंचांच्या निर्णयाने सर्व काही बदलून टाकले, ज्यामुळे शुभमन गिल संतापला.
ही संपूर्ण घटना न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील ३१ व्या षटकात घडली. जसप्रीत बुमराहच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर भारताने ग्लेन फिलिप्सविरुद्ध एलबीडब्ल्यूसाठी डीआरएस घेतला. जेव्हा चेंडू बॅटच्या जवळून गेला, तेव्हा स्निकोमीटरवर एक मोठी वाढ (स्पाइक) दिसत होती. मात्र, समोरून घेतलेल्या रिप्लेमध्ये बॅट आणि चेंडूमध्ये लक्षणीय अंतर असल्याचे दिसून आले.
Glenn Phillips survives with bad decision of DRS. There was clear gap between bat and ball.
Bumrah is lethal in Wellington. https://t.co/WA3kkcTqpA
— Parody Farrago Abdullah (@abdullah_0mar) November 19, 2026
तिसरे पंच पॉल रेफेल यांनी निर्णय दिला की चेंडू बॅटच्या आतल्या कडेला लागला होता. तिसऱ्या पंचांनी क्षेत्ररक्षक पंच रिचर्ड इलिंगवर्थ यांचा ‘नॉट आऊट’चा निर्णय कायम ठेवला, ज्यामुळे ग्लेन फिलिप्स बाद होण्यापासून वाचला. भारतीय कर्णधार शुभमन गिल पंचांच्या निर्णयावर नाराज दिसला. तो क्षेत्ररक्षक पंच रिचर्ड इलिंगवर्थ यांच्याशी वाद घालताना दिसला. पंचांचा निर्णय त्याच्या बाजूने नसल्यामुळे भारताने डीआरएसची संधी गमावली. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भारताने यापूर्वी तिसऱ्या षटकात डेव्हन कॉनवे आणि २७ व्या षटकात टॉम ब्लंडेल यांच्याविरुद्ध डीआरएसचा वापर केला होता. विशेष म्हणजे, दोन्ही प्रसंगी बुमराह गोलंदाज होता.
