AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा! ऐन दुष्काळात सरकारने घेतला गेमचेंजर निर्णय, आता थेट…

शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. आता ऐन दुष्काळात सरकारने गेमचेंजर निर्णय घेतला आहे. या निर्णयाने 6 तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा! ऐन दुष्काळात सरकारने घेतला गेमचेंजर निर्णय, आता थेट...
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 19, 2026 | 1:05 PM
Share

फडणवीस सरकारने सर्वात मोठा दिलासा दिला आहे. ऐन दुष्काळग्रस्त परिस्थितीत सरकारने गेमचेंजर निर्णय घेतला आहे. सरकारने आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याचा निर्णय घेतलाय. सरकारच्या निर्णयाने 6 तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना सरकारी मदत देखील मिळण्याची शक्यता आहे. ही माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे दादरच्या रेल्वे स्टेशनच्या नामांतराबाबत म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण समाजाची मागणी पूर्ण केली. आता आवश्यक कारवाया पूर्ण करण्यात येईल. दादरला चैत्यभूमी नाव देण्यात येणार आहे, हा निर्णय राज्यातील एका ऐतिहासिक निर्णयापैकी एक राहणार आहे. मी देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली मागणी पूर्ण केली. ही ऐतिहासिक मागणी आहे’.

शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयाबाबत बावनकुळे म्हणाले, ‘आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील 6 तालुक्यांना दुष्काळ यादीत घेण्याचा निर्णय घेतला. यात विक्रमगड, दिंडोरी, रायगडमधील एक, पालघर जिल्ह्यातील मधील दोन..या तालुक्याबाबत निर्णय झाला. अशोकराव माने यांनी वारंवार पाठपुरावा केला. हातकणंगले तालुक्याचा समाविष्ट करण्याची मागणी केली. त्यानंतर हातकणंगले तालुका देखील दुष्काळ यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. मी अशोकराव माने यांचे मनापासून अभिनंदन करतो. गडहिंग्लज तालुक्याचा समावेश दुष्काळ यादीत करावा, अशी मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी केली होती.  ही मागणी सरकारकडून तपासण्यात आली. आज मुख्यमंत्र्‍यांनी देखील गडहिंग्लज तालुका देखील दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी मान्य केली. आता महाराष्ट्रातील आणखी सहा तालुके दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आले’.

‘या आधी 304 तालुक्यांचा समावेश दुष्काळ यादीत करण्यात आला होता. त्यानंतर 310 तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला आहे. यासाठी हसन मुश्रीफ यांनीही प्रयत्न केले, त्यांचेही आभार मानतो. तसेच आणखी 13 तालुके दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करावीत, अशी मागणी ली आहे. त्या मागण्यादेखील तपासण्याचे काम सरकार करेल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Follow Us
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकर
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकरांचा थेट कोर्टात खेचणार असा इशारा!
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! PM नरेंद्र मोदी यांनी सांगितले...
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले कर सुधारणांचे फायदे
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा थेट पुरावे दाखवत दावा
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी नको, कारवाई करा! शायना एनसी...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी नको, कारवाई करा! शायना एनसी यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक
पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारलं थेट...
Sanjay Raut : पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारला नेमका प्रश्न...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय विरोधकांना थेट इशारा
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाहांना पत्र
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाह आणि राहुल गांधींना पत्र!
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची...
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय...
CM Fadnavis On Water Scarcity : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे...
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे लोक... जरांगे पाटील स्पष्टच बोलले