देशातील पहिल्या १०० इलेक्ट्रीक हायड्रोफॉईल बोटीची यशस्वी चाचणी, जलप्रवासाला मोठी संजिवनी ठरणार
भारतात जागतिक दर्जाचे सागरी तंत्रज्ञान आणण्याचा फडणवीस सरकारचा प्रयत्न असून शाश्वत जलवाहतुकीमध्ये महाराष्ट्राला अव्वल स्थानावर नेण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुंबई आणि कोकणला लाभलेल्या किनारपट्टीमुळे आता मुंबई ते कोकण, अलिबाग आणि रायगड असा प्रदुषणमुक्त जलप्रवास आता शक्य होणार आहे. डिझेल बोटींच्यावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक बोटींचा पर्याय चाचपडून पाहण्यात येणार होता. मात्र, आता इलेक्ट्रीक बोटींपेक्षाही भारतीय पहिल्या १०० इलेक्ट्रीक हायड्रोफॉईल बोटीची चाचणी यशस्वी झाली आहे.यामुळे मुंबईकरांना कोकणात तर जाता येईलच शिवाय अलिबाग आणि एलिफंटा तसेच बेलापूरला पर्यंत जाता येणार आहे.
मुंबईतील गेटवे ते एलिफंटा आणि अलिबाग-मांडवा फेरी बोटी सुटत असतात. या बोटींची अवस्था नीट नसते. तसेच डिझेल इंजिनामुळे या बोटीचा वेग कमी असतो आणि प्रदुषण होत असते. आता देशातील पहिली १०० इलेक्ट्रीक हायड्रोफॉईल बोटीची चाचणी यशस्वी झाली आहे. महाराष्ट्र सागरी महामंडळ आणि पोर्ट ट्रस्ट यांच्या सहकार्याने आता सागरी प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे. स्वीडनमधून आयात केलेल्या इलेक्ट्रिक कॅन्डेला पी-१२ हायड्रोफॉइल बोटीच्या यशस्वी चाचणी प्रवाशांचा मोठा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली इलेक्ट्रिक कॅन्डेला पी-१२ हायड्रोफॉइल या बोटीची चाचणी करण्यात आली आहे.
India’s First 100% Electric Hydrofoil Vessel Undergoes Successful Trials in Maharashtra!
A major milestone in India’s sustainable maritime journey! India’s first fully electric Candela P-12 hydrofoil vessel, imported from Sweden, is undergoing successful trials in Maharashtra.
Under the visionary leadership of Hon’ble Chief Minister Shri Devendraji Fadnavis and Minister of Ports Shri Niteshji Rane, this joint initiative of the Government of Maharashtra, Rural Enhancers Group, and Saadhav Shipyards Limited showcases the Maharashtra Maritime Board’s commitment to bringing world-class maritime technologies to India, positioning Maharashtra at the forefront of sustainable water transportation. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
— Nitesh Rane (@NiteshNRane) November 20, 2026
जलवाहतूकीचे मार्ग पुन्हा सक्रीय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आज स्वीडनमधून आयात केलेल्या इलेक्ट्रिक कॅन्डेला पी-१२ हायड्रोफॉइल यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार, रुरल एनहान्सर्स ग्रुप आणि साधव शिपयार्ड्स लिमिटेड यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. सध्या देशात सागरी वाहतूकीसाठी इलेक्ट्रीक बोटी ( वॉटर टॅक्सी ) चा वापर कोच्ची येथे यशस्वीपणे केला जातो. मात्र , या नवीन १०० इलेक्ट्रीक हायड्रोफॉईल तंत्रज्ञानात बोटीचा वेग जास्त असून स्पीड बोट प्रमाणे ही बोट पाण्यावर तरंगत अंतर कापते. त्यामुळे जलवाहतूकीचे मार्ग पुन्हा सक्रीय होण्याची आशा निर्माण झाली आहे.
