AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Kapoor : शरद कपूरच्या कुत्र्यांना ठेवलेल्या शेल्टरजवळ नको ते घडलं, अभिनेत्याची केअरटेकर संजय दत्तचं नाव घेत म्हणाली…

Hema Chaudhary Post : शरद कपूरची केअरटेकर हेमा चौधरीनं शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत आला आहे.

Sharad Kapoor : शरद कपूरच्या कुत्र्यांना ठेवलेल्या शेल्टरजवळ नको ते घडलं, अभिनेत्याची केअरटेकर संजय दत्तचं नाव घेत म्हणाली...
| Updated on: Nov 20, 2026 | 10:13 PM
Share

अभिनेता शरद कपूर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी शरदच्या प्रकृतीची आणि आर्थिक परिस्थितीची माहिती समोर आल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्याच्या मदतीसाठी पुढे आले होते. त्याच्या चार पाळीव कुत्र्यांची जबाबदारीही प्राणीप्रेमी हेमा चौधरी यांनी घेतली आहे. मात्र, आता याच कुत्र्यांना ठेवण्यात आलेल्या मालाडमधील ‘बेजुबान’ शेल्टरच्या परिसरात आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोणीतरी जाणीवपूर्वक आग लावल्याचा आरोप हेमा चौधरी यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात एका व्यक्तीनं संजय दत्तचं नाव घेतल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

काय घडलं नेमकं?

हेमा चौधरी या ‘बेजुबान पब्लिक वेल्फेअर ट्रस्ट’च्या संस्थापक असून त्या प्राण्यांच्या मदतीसाठी काम करतात. मालाडमधील मढ आयलंड परिसरातील धारावली गावात त्यांचं शेल्टर आहे. या शेल्टरच्या अगदी जवळ मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या लाकडांना आग लागल्याचं त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं. हेमा यांनी सांगितलं की, कोणीतरी जाणीवपूर्वक या लाकडांना आग लावून तिथून निघून गेलं. या आगीमुळे शेल्टरमधील प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. कारण आग शेल्टरपर्यंत पोहोचली असती, तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.

हेमा चौधरी यांनी सांगितलं की, त्यांच्या शेल्टरमध्ये शरद कपूरच्या चार कुत्र्यांसह जवळपास 40 हून अधिक कुत्रे आहेत. त्यामुळे आग लागल्याची घटना त्यांच्यासाठी अत्यंत चिंताजनक होती. एका ट्रकभर लाकडांचा साठा शेल्टरसाठी देण्यात आला होता. मात्र, याच लाकडांना आग लावण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. शरद कपूरचे चार पाळीव कुत्रे सध्या प्राणी कल्याण केंद्राच्या देखरेखीखाली आहेत. शरदच्या आरोग्यविषयक आणि कौटुंबिक अडचणींमुळे त्यांना काही काळासाठी शेल्टरमध्ये हलवण्यात आलं आहे.

हेमा चौधरी यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. प्राणी कल्याण क्षेत्राशी संबंधित एका व्यक्तीनं त्यांना शेल्टर बंद करण्याची धमकी दिल्याचं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही, तर त्या व्यक्तीनं जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही दावा त्यांनी केला आहे. हेमा यांनी सांगितलं की, संबंधित व्यक्तीनं शरद कपूरची भेट घेतली होती. त्यावेळी त्यानं संजय दत्तसोबत बोलणं झालं असल्याचं म्हटलेलं.

सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर आपल्याला रात्रभर धमक्या मिळाल्याचंही हेमा यांनी सांगितलं. या व्यक्तीने केलेल्या शिवीगाळीची रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी दुसऱ्या दिवशी पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल करणार असल्याचं हेमा यांनी स्पष्ट केलं. तसंच शरद कपूरशी संबंधित वादात निष्पाप प्राण्यांना ओढू नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

Follow Us
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर