AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prithviraj Chavan: अजित पवारांच्या अपघाताचा खरा अहवाल कधी प्रसिद्ध होणार? पृथ्वीराज चव्हाणांचा थेट सवाल; शरद पवारांबाबतही भाष्य

Prithviraj Chavan On Sharad Pawar: शरद पवार चुकीचा निर्णय घेणार नाहीत, अशी पृथ्वीराज चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांच्या अहवालावरही प्रश्न केला आहे.

Prithviraj Chavan: अजित पवारांच्या अपघाताचा खरा अहवाल कधी प्रसिद्ध होणार? पृथ्वीराज चव्हाणांचा थेट सवाल; शरद पवारांबाबतही भाष्य
Prithviraj Chavan
| Updated on: Nov 20, 2026 | 10:02 PM
Share

महाराष्ट्रातील राजकारण जातीच्या आधारावर सुरू असून, इतिहासाची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे इतिहासाची वस्तुनिष्ठ पुनर्निर्मिती होणे आवश्यक आहे, अशी भूमिका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली. लेखक श्रीपाल सबनीस यांनी आपल्या पुस्तकातून अवघड विषयाला हात घालत वस्तुनिष्ठ विश्लेषण केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

एका सांस्कृतिक कार्यक्रमात बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, त्यांच्या जडणघडणीत पुस्तकांचा मोठा वाटा आहे. सर्वप्रथम त्यांनी नाथ माधव यांच्या कादंबऱ्या वाचल्या. त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख झाली. मात्र इतिहास आणि आपली चुकामूक झाली आहे. महाराष्ट्रात ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद पसरवण्यात आला आणि दोन्ही बाजूंनी अतिरेक करण्यात आला. श्रीपाल सबनीस स्वतः ब्राह्मण असूनही त्यांनी इतिहास स्पष्टपणे आणि वस्तुनिष्ठपणे मांडला आहे, असे चव्हाण म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे आहे. महाराजांचा विचार सर्वधर्मसमभावाचा होता. त्यांच्या मूळ चरित्राचा अभ्यास केल्यास हा विचार स्पष्टपणे दिसतो. त्यांच्या मृत्यूबाबतही अनेक तर्कवितर्क लावले जातात. त्यामुळे इतिहासाचे वस्तुनिष्ठ पुनर्लेखन होणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. आपल्या शिक्षणपद्धतीत सामाजिक शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मूळ संशोधन मराठीत झाले आणि त्यानंतर त्याचा इंग्रजीत अनुवाद झाला, याचा आनंद असल्याचेही ते म्हणाले.

डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना हा एका वाक्यात बोलण्यासारखा विषय नाही. त्यावर स्वतंत्र व्याख्यानातून सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. एनडीए आघाडीला डिलिमिटेशनला विरोध नाही; मात्र दक्षिण भारतातील राज्यांवर अन्याय होऊ नये, ही अपेक्षा आहे. महिला आरक्षण, वन नेशन वन इलेक्शन आणि डिलिमिटेशन हे मुद्दे एकत्र करून घुसडण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली.

शरद पवार यांनी पुढे काय करावे, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. पवारसाहेब चुकीचा निर्णय घेणार नाहीत, अशी अपेक्षा असल्याचे चव्हाण म्हणाले. अजित पवार यांच्या अपघाताबाबतचा अहवाल समोर आल्याशिवाय भाष्य करणे योग्य ठरणार नाही. मात्र, हा अहवाल अद्याप का आलेला नाही, तो कोण लपवत आहे आणि त्याला इतका वेळ का लागत आहे, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. खरा अहवाल कधी प्रकाशित होणार, असा सवालही त्यांनी केला.

सोनिया गांधी यांच्या पुस्तकाबाबत बोलताना चव्हाण म्हणाले, की त्यामध्ये अनेक राजकीय आणि वैयक्तिक प्रसंगांची माहिती देण्यात आली आहे, जी यापूर्वी त्यांनाही माहिती नव्हती. भाजपकडून सोनिया गांधी यांच्या पुस्तकावर टीका होत असल्याने पुस्तकाचा खप वाढत असल्याचेही त्यांनी म्हटले.

Follow Us
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर