Shani Dev : शनीची साडेसाती खूपचं नडते आहे का? शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी आत्ताच करा या 4 गोष्टी!
बऱ्याच लोकांच्या मागे शनीची पीडा लागलेली असते. ज्याला आपण साडेसाती देखील म्हणतो. शनीची दृष्टी असलेल्या लोकांना बऱ्याच चढ उतारांना सामोरे जावे लागते. पण काही उपाय तुम्हाला या साडेसातीपासून वाचवू शकते.

आपण अनेकवेळा शनिदेवाला साडेसाती देणारा, पीडणारा देव असे आपण म्हणतो. ज्याच्या नशीबात शनी असतो त्याचे जीवन कठीण असते, भरपूर चढ उतारांनी भरलेले असते. पण वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवाला कर्म देणारा आणि न्यायाचा देव म्हटले जाते. असे मानले जाते की शनि माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिची महादशा १९ वर्षे चालते. या काळात माणसाला जीवनात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. कधीकधी कामाला विलंब होतो, तर कधी आर्थिक आणि कौटुंबिक समस्या वाढतात. शनिची महादशा केवळ संकटाचा काळ मानली जात नाही. या काळात संयम, कठोर परिश्रम आणि सत्कर्मे देखील यशाचा मार्ग मोकळा करतात. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, काही विशेष उपायांनी शनिदेवाचा आशीर्वाद मिळवता येतो. त्याची साडेसाती कमी करता येते.
हनुमानजींची पूजा केल्याने शनीच्या त्रासातून मुक्ती मिळेल.
शनि महादशेत भगवान हनुमानाची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, जे लोक हनुमानाची भक्तिभावाने पूजा करतात, ते शनीच्या प्रतिकूल प्रभावांपासून मुक्त होतात.साडेसाती कमी करण्यासाठी दररोज हनुमान चालिसेचे पठण करा. जर दररोज पठण करणे शक्य नसेल, तर मंगळवार आणि शनिवारी त्याचे पठण करा. आपण भगवान हनुमानाला कुंकू आणि मोगऱ्याचे तेल अर्पण करू शकता. पूजेदरम्यान, धैर्य, संयम आणि कठीण परिस्थितींवर मात करण्याची शक्ती मिळावी यासाठी प्रार्थना करा.
निरोगी आहार आणि दिनचर्या अंगीकारा
शनिदेव शिस्त आणि संयमाशी संबंधित देवता आहे. त्यामुळे, शनि असणाऱ्या लोकांनी दैनंदिन दिनचर्या कठोरतेने पाळणे आणि सद्गुणी जीवन जगणे शुभ मानले जाते. मांस आणि मद्यपान टाळावे आणि शुद्ध व पौष्टिक अन्नाचे सेवन करावे. आपल्या बोलण्यात आणि वागण्यात संयम ठेवा. नियमित योग, ध्यान आणि प्रार्थनेसाठी वेळ काढा. रात्री उशिरापर्यंत जागे राहणे आणि आळस टाळण्याचा प्रयत्न करा. अशी धार्मिक श्रद्धा आहे की जे लोक आपल्या जीवनात शिस्त पाळतात आणि वाईट सवयी टाळतात, त्यांना शनिदेवाचा आशीर्वाद लाभतो.
गरजू आणि प्राण्यांना मदत करा
गरजू लोकांना मदत करणे हा शनिदेवांना प्रसन्न करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग मानला जातो. गरीब, वृद्ध आणि असहाय्य लोकांना अन्न, वस्त्र किंवा जीवनावश्यक वस्तू दान करावे आणि हे काम शनिवारी करावे. याशिवाय, प्राणी आणि पक्ष्यांना अन्न व पाणी देणे हे देखील एक चांगले कार्य मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, शनि महादशेत निस्वार्थ सेवा आणि दानधर्म केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात. मदत करताना, दिखाव्याऐवजी सेवेची भावना मनात ठेवा.
प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमाला महत्त्व द्या
शनिदेव हे कर्माचा फळ देणारा ग्रह आहे. त्यामुळे ज्यांना शनिदोष आहे त्यांनी प्रामाणिकपणे काम करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कोणालाही फसवणे, लाच घेणे किंवा गैरमार्गाने पैसे कमावणे टाळा. आपल्या नोकरी आणि व्यवसायातील जबाबदाऱ्या पूर्ण जबाबदारीने पार पाडा. कधीकधी, कठोर परिश्रम करूनही फळ मिळण्यास विलंब होऊ शकतो, परंतु अशा वेळी निराश होऊन चुकीचा मार्ग स्वीकारू नका. ज्योतिषशास्त्रानुसार, जे मेहनती, शिस्तप्रिय आणि सत्याच्या मार्गावर चालणारे असतात, त्यांना शनिदेव शुभ फळे देतात.
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.
