AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदाराने संसदेत गर्लफ्रेंडला केला प्रपोज, स्पीकरही अचंबित, उत्तर काय मिळालं?

ऑस्ट्रेलियाचे खासदार जॉर्डन लेन यांनी संसदेत आपल्या शेवटच्या भाषणादरम्यान गर्लफ्रेंड नतालीला लग्नासाठी प्रपोज केले. अंगठी काढून सभागृहासमोरच त्यांनी विचारणा केली आणि नतालीने 'हो' म्हटले. या अनपेक्षित घटनेने स्पीकरसह सर्वांनाच धक्का बसला, पण नंतर सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले.

खासदाराने संसदेत गर्लफ्रेंडला केला प्रपोज, स्पीकरही अचंबित, उत्तर काय मिळालं?
MP Jordan LaneImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 20, 2026 | 10:54 PM
Share

बातमी ऑस्ट्रेलियातील आहे. येथील एका खासदाराने संसदेचं कामकाज सुरू असतानाच त्याच्या गर्लफ्रेंडला लग्नाचा प्रपोज केला. न्यू साऊथ वेल्सच्या संसदेत लिबरल पार्टीचे खासदार जॉर्डन लेन यांचं समारोपाचं भाषण सुरू होतं. त्यावेळी त्यांनी अचानक अंगठी काढली आणि प्रेक्षक गॅलरीत बसलेली आपली प्रेमिका नतालीला लग्नाची विचारणा केली. तू माझ्याशी लग्न करणार का? असं त्यांनी संसदेत उपस्थित सर्वांसमोरच तिला विचारलं. जॉर्डन यांचा प्रपोजचा हा अनोखा अंदाज पाहून सर्वांनीच टाळया वाजवून आनंद व्यक्त केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जॉर्डन आणिनताली गेल्या 10 वर्षापासून रिलेशनमध्ये आहेत.

32 वर्षीय जॉर्डन लेन पहिल्यांदाच लिबरल पार्टीच्या तिकीटावर निवडून आले आहेत. 6 नोव्हेंबर रोजी त्यांनी राज्याच्या राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती. राइड मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करताना राजकारणात असताना वैयक्तिक आयुष्यावर त्याचा खूप परिणाम झाला आहे, असं जॉर्डन यांनी सांगितलं. मार्चमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या आधीच त्यांनी राज्याच्या राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. दोन आठवड्यापूर्वीच त्यांनी पुन्हा निवडणूक न लढण्याचा आणि राजकारण सोडण्याची घोषणा केली होती. त्यामुळेच न्यू साऊत वेल्सच्या संसदेत त्यांनी समारोपाचं भाषण दिलं. त्यांचं हे शेवटचं भाषण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक संस्मरणीय क्षण ठरेल, असं कुणालाही वाटलं नव्हतं.

खासदाराचा प्रपोज

जॉर्डन हे सभागृहात केंद्रीय मेजाजवळ उभे राहून भाषण करत होते. स्पीकर महोदय, राइडचा सदस्य म्हणून माझा शेवटचा प्रश्न माझ्या आयुष्यातील प्रेम नताली हिला आहे, असं जॉर्डन म्हणाले. त्यानंतर त्यांनी खिशातून एक अंगठी काढली अन् प्रेक्षक गॅलरीत जाऊन नतालीजवळ जाऊन तू माझ्याशी लग्न करणार का? असा सवाल तिला केला. नतालीनेही त्यांचा प्रस्ताव आनंदाने स्वीकारला. अचानक घडलेल्या या घटनाक्रमानंसर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. सर्वांनी टाळ्या वाजवून दोघांचं स्वागत केलं. यावेळी जॉर्डन आणि नताली यांनी एकमेकांच्या हाताचा किस केला. त्यानंतर पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.

मी संसदेला सांगू इच्छितो की…

त्यानंतर जॉर्डनने एक मिश्किल विधान केलं. मी सभागृहाच्या अधिकृत रेकॉर्डमध्ये हे नोंदवू इच्छितो की, तिने होय म्हटलंय, असं जॉर्डन यांनी म्हणताच सभागृहात एकच खसखस पिकली. न्यू साऊथ वेल्सच्या विधानसभेचे स्पीकर ग्रेग पाइपर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 58 वी संसद प्रेमाची संसद म्हणून ओळखली जाईल, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

Follow Us
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर