AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लालपरीला ब्रेक लागणार, कामगारांच्या एका निर्णयामुळे प्रवाशांची धाकधूक वाढली

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा थकबाकीचा हप्ता रखडल्याने कामगारांमध्ये तीव्र संताप. प्रताप सरनाईक यांच्या आश्वासनानंतरही फेब्रुवारीच्या पगारात कपात झाल्याने १२ फेब्रुवारीपासून आंदोलनाची हाक दिली आहे.

लालपरीला ब्रेक लागणार, कामगारांच्या एका निर्णयामुळे प्रवाशांची धाकधूक वाढली
st bus
| Updated on: Feb 10, 2026 | 8:09 AM
Share

राज्य परिवहन एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि थकीत वेतनवाढीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या थकबाकीचा हप्ता देण्याबाबत सरकार आणि महामंडळ स्तरावर हालचाली होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या ११ फेब्रुवारीपर्यंत प्रशासनाने ठोस पावले न उचलल्यास १२ फेब्रुवारीपासून संपूर्ण राज्यात निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे.

आश्वासनांची पूर्तता कागदावरच?

परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत आश्वासन दिले होते. २०२० ते २०२४ या चार वर्षांच्या काळातील कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ६,५०० रुपयांची वाढ करण्यात आली होती. या वाढीमुळे निर्माण झालेली थकबाकी कर्मचाऱ्यांना ४८ समान हप्त्यांमध्ये देण्याचे निश्चित झाले होते. या निर्णयाची अंमलबजावणी डिसेंबर २०२५ पासून सुरू झाली. मात्र फेब्रुवारी २०२६ च्या पगारात हा हप्ता गायब असल्याने कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

आर्थिक गणित कोलमडले

एसटी कर्मचारी अल्प वेतनात काम करत आहेत. वाढीव हप्त्यामुळे त्यांच्या हातात काही अधिकची रक्कम पडत होती. महागाईच्या काळात घरखर्च, बँकांचे हप्ते आणि मुलांच्या शैक्षणिक शुल्काचे नियोजन कर्मचाऱ्यांनी या वाढीव वेतनावर केले होते. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या पगारात हप्ता न आल्याने कामगारांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. प्रशासनाने दिलेला शब्द पाळला नाही, तर आम्ही गप्प बसणार नाही, अशी भावना कामगार प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.

काय आहेत संघटनेच्या प्रमुख मागण्या?

  • ११ फेब्रुवारीपर्यंत रखडलेला थकबाकीचा हप्ता त्वरित खात्यात जमा करावा.
  • वेतन करारातील प्रलंबित मुद्द्यांवर प्रशासनाने तातडीने बैठक घ्यावी.
  • भविष्यात हप्ते रोखले जाणार नाहीत याची लेखी हमी द्यावी.

जर उद्या (११ फेब्रुवारी) संध्याकाळपर्यंत महामंडळाने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर गुरुवारी सकाळपासून राज्यातील सर्व आगार (Depots) आणि विभागीय कार्यालयांसमोर कर्मचारी काळ्या फिती लावून निदर्शने करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.