रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच एकनाथ शिंदेंचा कामाचा धडाका, ठाण्यातील आपत्ती निवारण कक्षाला भेट
राज्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, रस्त्यांवर पाणी साचणे आणि वाहतुकीवर परिणाम होणे अशा घटना सातत्याने समोर येत आहेत.
राज्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, रस्त्यांवर पाणी साचणे आणि वाहतुकीवर परिणाम होणे अशा घटना सातत्याने समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आपत्तीव व्यस्थापन कक्षाला भेट दिली आहे. अलीकडेच ते आजारी असल्याचं समोर आलं होतं.
एकनाथ शिंदे ठाण्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात दाखल झाले आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांकडून राज्यातील पावसाची परिस्थिती, बचाव कार्य आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सविस्तर माहिती घेतल्याचं सांगितलं जात आहे. विविध जिल्ह्यांतील प्रशासनाशी संपर्क ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कर्मचाऱ्यांशी संवादही साधला.
मुसळधार पावसामुळे प्रभावित भागांमध्ये तातडीने मदत पोहोचवण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिल्याचेही सांगितले जात आहे. तसेच आधीही शिंदेंनी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे असे सांगितले होते.
Published on: Jul 08, 2026 03:43 PM
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच एकनाथ शिंदेंचा कामाचा धडाका, ठाण्यातील
NDA प्रवेशाच्या चर्चांवर संजय गायकवाडांचं मोठं विधान
आघाडी सरकारने 14 कारणं देत...मिसिंग लिंकचा फडणवीसांनी इतिहास मांडला, व
इंद्रायणीला महापूर; वारकऱ्यांना येऊ नका, सरकारचं मोठं आवाहन

