Viral Video: चिल्लाओ मत…, संजय कपूरची 30 हजार कोटींची संपत्ती, सवतींमध्ये घमासान, व्हिडीओ पाहून म्हणाल…

Karisma Kapoor on Sunjay Kapur Property: 1900 कोटी दिल्यानंतर करिश्मा आणखी काय हवंय? संजय कपूर याच्या निधनानंतर सवतींमध्ये वाद टोकाला, कोर्टातील व्हिडीओ समोर, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त व्हायरल व्हिडीओची चर्चा...

Viral Video: चिल्लाओ मत..., संजय कपूरची 30 हजार कोटींची संपत्ती, सवतींमध्ये घमासान, व्हिडीओ पाहून म्हणाल...
फाईल फोटो
| Updated on: Sep 13, 2025 | 8:58 AM

Karisma Kapoor on Sunjay Kapur Property: उद्योजक संजय कपूर याच्या निधनानंतर कुटुंबियांमध्ये संपत्तीवरून वाद सुरु आहे. करिश्मा कपूरच्या मुलांनी त्यांचे वडील संजय कपूर यांची तिसरी पत्नी प्रिया सचदेव हिच्यावर फसवणुकीचा आरोप केले असून असून वडिलांच्या संपत्तीमध्ये त्यांचा हक्क मागितला आहे. आता मालमत्तेच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान करिश्मा कपूर आणि प्रिया सचदेव यांचे वकील एकमेकांशी भांडताना दिसले, ज्यामुळे कोर्टातील वातावरण खूपच तापल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

बार एंड बेंचने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये करिशमा कपूर हिचे वकील महेश जेठमलानी म्हणाली, ‘माझ्यावर ओरडू नका…’, तर प्रिआ सचदेव हिचे वकील राजीव नायर संतापात म्हणाले, ‘मला मध्येच बोलण्यापासून आडवू नका…’, व्हिडीओ 21 मिनिटांचा असून सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

 

 

एकमेकांवर केले गंभीर आरोप…

व्हिडीओमध्ये असं दिसत आहे की, दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केला आणि एकमेकांवर सुनावणीत अडथळा आणल्याचा आरोप केला. करिश्मा कपूरची मुले समायरा कपूर आणि कियान राज कपूर त्यांच्या दिवंगत वडिलांच्या मालमत्तेत त्यांचा वाटा मागत आहेत, तर संजय कपूर याची तिसरी पत्नी प्रिया सचदेव कपूर दावा करत आहेत की दिवंगत उद्योजकाने त्याची संपूर्ण वैयक्तिक मालमत्ता तिला मृत्युपत्राद्वारे दिली आहे.

सध्या संपत्तीप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु आहे. सुनावणीत दोन्ही पक्षांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. ‘याचिका दाखल करण्याआधीच समायरा आणि कियान यांना ट्रस्टने 1900 कोटींची संपत्ती दिली आहे. राणी कपूर ट्रस्टने त्यांना त्यांचा अधिकार दिला आहे.’ असं प्रिया हिने सांगितलं आहे. याप्रकरणी आता पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.