AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोर्ट मॅरेजच्याच दिवशी प्रेग्नंसीची गुड न्यूज..; स्वरा भास्करचा खुलासा, लग्नानंतर 7 महिन्यांतच मुलीचा जन्म

Swara Bhasker: अभिनेत्री स्वरा भास्करने लग्नाच्या तीन-चार महिन्यांतच गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आणखी एक मोठा खुलासा केला आहे. लग्नाआधीच आयव्हीएफने गरोदर होण्याचा प्रयत्न केल्याचं तिने सांगितलं.

कोर्ट मॅरेजच्याच दिवशी प्रेग्नंसीची गुड न्यूज..; स्वरा भास्करचा खुलासा, लग्नानंतर 7 महिन्यांतच मुलीचा जन्म
Swara Bhasker and Fahad AhmadImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 28, 2026 | 2:54 PM
Share

Swara Bhasker: अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या ‘राइज अँड फॉल 2’ या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. या शोदरम्यान स्वराने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. लग्नाआधीच आई होण्याची इच्छा असल्याने तिने अनामिक स्पर्म डोनरच्या मदतीने दोन वेळा IVF उपचार करून घेतले होते, असं तिने सांगितलं. मात्र, दोन्ही प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर तिच्या आयुष्यात फहाद अहमदची एण्ट्री झाली आणि पूर्ण चित्रच बदललं. ‘राइज अँड फॉल 2’मध्ये आपल्या आयुष्याबद्दल बोलताना स्वराने सांगितलं की, एका टप्प्यावर तिला तिचं लग्न होणार नाही असं वाटत होतं. त्यामुळे लग्नाची वाट न पाहता स्वतःच कुटुंब सुरू करण्याचा निर्णय तिने घेतला होता.

स्वराने तिच्या आईवडिलांनाही या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल सांगितलं होतं. सुरुवातीला तिच्या पालकांना थोडी चिंता वाटली. भारतासारख्या देशात लग्नाशिवाय आई होण्याचा निर्णय आव्हानात्मक ठरू शकतो, असं त्यांनी स्वराला सांगितलं. मात्र, हा निर्णय तिला योग्य वाटत असेल तर तिने तो घ्यावा, अशी भूमिका पालकांनी घेतली. स्वराने पुढे सांगितलं की, तिला खरंच आई व्हायचं होतं आणि स्वतःचं कुटुंब असावं अशी तिची इच्छा होती. त्यामुळे तिने अनामिक स्पर्म डोनरच्या मदतीने दोन वेळा IVF प्रक्रिया करून घेतली. मात्र, हे दोन्ही प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.

पहा व्हिडीओ-

IVFचे दोन्ही प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर स्वराच्या आयुष्यात फहाद अहमद आला. या दोघांची आधी मैत्री झाली आणि त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. स्वराने सांगितलं की, दोघांनी जवळपास तीन महिने डेटिंग केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. यानंतर दोघांनी कोर्ट मॅरेज केलं. याच काळातील दोन आनंदाच्या बातम्यांचा उल्लेख करत स्वरा पुढे म्हणाली, “आम्ही कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यावेळी आम्हाला दोन गुड न्यूज एकाच वेळी मिळाल्या.” तिच्या या वक्तव्यामुळे स्वराच्या वैयक्तिक आयुष्यातील हा टप्पा पुन्हा चर्चेत आला आहे.

स्वरा आणि फहाद यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर त्यांनी कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीनेही लग्नाचा आनंद साजरा केला. सप्टेंबर 2023 मध्ये दोघांच्या मुलीचा जन्म झाला. तिचं नाव राबिया आहे. 6 जून रोजी स्वराने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. लग्नाच्या तीन ते चार महिन्यांतच गरोदर झाल्याने स्वराला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. इतकंच नव्हे तर प्रेग्नंसी फोटोशूटनंतरही स्वराला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

Follow Us
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...