विजय यांच्या सरकारमधील मंत्र्याचा पत्नीसोबत घटस्फोट, लॉटरी किंगच्या लेकीच्या आयुष्यात घडामोड, थेट 14 वर्षांनी..
तामिळनाडूच्या राजकारणातून मोठी बातमी पुढे येत आहे. तामिळनाडूचे मंत्री आधव अर्जुन आणि त्यांची पत्नी डेझी मार्टिन यांनी लग्नाच्या तब्बल 14 वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली.

तामिळनाडूच्या राजकारणातून एक मोठी आणि महत्वाची बातमी पुढे येत आहे. अत्यंत मोठी बातमी आहे. तामिळनाडूचे मंत्री आधव अर्जुन आणि त्यांची पत्नी डेझी मार्टिन यांनी लग्नाच्या तब्बल 14 वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने एकच खळबळ उडाली. दोघांनी परस्पर सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. डेझीने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. आम्ही सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. विशेष म्हणजे डेझी या देशातील प्रसिद्ध लॉटरी व्यावसायिक असलेल्या सॅटियागो मार्टिन यांची मुलगी आहेत. फक्त नेत्याची पत्नीच नाही तर अनेक कंपन्यांच्या त्या संचालक देखील आहेत. सामाजिक कार्यातही त्या आग्रेसर आहेत. डेली आणि अर्जुन विभक्त होत असल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला.
डेली यांनी म्हटले की, 14 वर्षाच्या सहजीवनात प्रेम, समजूतदारपणा आणि काही बदलांचा एकत्र सामना केला. चांगले मित्र, पालक आणि जीवनसाथी म्हणून वेगवेगळे टप्पे एकत्र पार केले. पण आता पती पत्नी म्हणून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. विभक्त होण्याचा निर्णय घेत असलो तरीही मुलांचे संगोपन एकत्र पार पाडणार आहोत. मुलांचा आनंद, त्यांचे कल्याण हे सर्वाधिक महत्वाचे आहे.
हेड नाही तर डेझी यांनी हे देखील म्हटले की, आधव अर्जुन यांच्याबद्दल कायमच मनात आदर राहिल. दोघांच्याही आयुष्याचा आदर करावा. आवश्यक गोपनीयता द्यावी, असेही त्या पोस्टमध्ये आवाहन करण्यात आले. डेझी मार्टिन या फक्त एका राजकीय नेत्याच्या पत्नीच नाही तर त्या यशस्वी उद्योजिका देखील आहेत.
त्यांच्या वडिलांचे नाव लॉटरी जगतात मोठे आहे. त्या स्वत: काही कंपन्यांच्या मॅनेजिंग डायरेक्टर देखील आहेत. मात्र, या दोघांचा घटस्फोट नक्की का होत आहे, याबाबत काही माहिती ही मिळू शकली नाहीये. विजय थलपती यांचेही खासगी आयुष्य कायमच चर्चेत राहिले आहे. त्यांच्या पत्नीनेही घटस्फोटासाठी अगोदर अर्ज केला आणि अचानक तो अर्ज त्यांनी मागे घेतला.