ऑनलाईन प्रेमाची सीमा-सचिन स्टाईल कहाणी अपयशी ठरली, कॅनडातून प्रेमासाठी धावत ती आली, पण, सत्य माहिती होताच हादरला युवक…
पाकिस्तानी सीमा हैदर आणि नोएडाचा सचिन याची प्रेमकहानी जरी यशस्वी झाली असली तरी एका कॅनेडियन महिला आणि राजस्थानाच्या नितीन यांच्या ऑनलाईन प्रेमकहाणीमध्ये मात्र,ट्विस्ट आला आहे.

पाकिस्तानची सीमा हैदर आणि दिल्ली – ग्रेटर नोएडाचा सचिन मीना यांची ऑनलाईन प्रेमकहाणी गाजली होती. साल २०१९ मध्ये ऑनलाईन पबजी गेममधून दोघांची ओळख झाली होती. मात्र, अशाच एक ऑनलाईन प्रेमकहाणीचा एंड खतरनाक झाला आहे. कॅनडाहून ऑनलाईन प्रेम जळल्यानंतर एक महिला राजस्थानात पोहचली. डेटिंग ऐप्सने ओळख झालेल्या पुरुषाशी लग्न करण्यासाठी ही कॅनेडियन महिला साता समुद्रापार आली खरी. परंतू हे दोघे जण प्रत्यक्षात जेव्हा एकमेकांसमोर आले तेव्हा तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला. या ऑनलाईन प्रेम कहाणीते नेमके काय झाले वाचा…
कॅनेडातून एक महिला राजस्थानला आपल्या ऑनलाईन प्रेमीला भेटण्यासाठी आली. तिला ज्या पुरुषाशी प्रेम जडले होते. तेव्हा तो समोर आला आणि त्याने तिच्याकडे पाहिले तेव्हा त्याला धक्का बसला. या पुरुषाने आता वयाचा हवाला देऊन तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला आहे. दोघांमध्ये लग्नावरुन भांडण झाल्यानंतर या महिलेने कॅनडाच्या दुतावासाशी संपर्क केला. दुतावासाच्या सूचनेवरुन या प्रकरणात पोलिसांना दखल घ्यावी लागली. ही घटना बीबी बिल्डर्स सोसायटीत झाले. ही महिला पर्यटन व्हीसावर भारतात आली होती.
काय आहे नेमके प्रकरण ?
13 नोव्हेंबर रोजी सकाळी चार वाजता कॅनडा दुतावासाच्या सूचनेनंतर नीमराणा पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी महिला आणि त्या पुरुषाला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणले. नीमराणा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी सुरेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार हरियाणाच्या पानीपत येथील रहिवासी नितीन यांना एक वर्षापूर्वी एका डेटिंग ऐप्सद्वारे एका कॅनेडातील महिलेशी संपर्क आला होता. दोघांमध्ये हळूहळू मैत्री होऊन तिचे प्रेमात रुपांतर झाले. आणि दोघांनी आता लग्न करण्याचा निर्णय घेता.
ही कॅनडाची महिला ११ नोव्हेंबर रोजी टुरिस्ट व्हीसावर दिल्लीला पोहाचली. नितीन तिला घेण्यासाठी एअरपोर्टला गेला आणि नीमराणा पोलिस ठाणे हद्दीतील त्याच्या मामा-मामीच्या फ्लॅटवर कॅनेडीयन महिलेला त्याने आणले. महिला नितीन सोबत सोसायटीत दोन दिवस राहिली.
कसा सुरु झाले भांडण ?
जेव्हा लग्नासंदर्भात दोघांमध्ये बोलणी सुरु झाली तेव्हा महिलेचे वय ६१ असल्याचे कळल्याचा दावा नितीन याने केला आहे. यामुळे नितीन याने लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितले जाते. याविषयावरुन दोघात कडाक्याचे भांडण झाले. १३ नोव्हेंबर रोजी महिलेने कॅनडा दुतावासाला कळवले. आणि त्यानंतर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. आता पोलिसांनी दोघांची चौकशी करत आहे.
पोलिसांची चौकशी सुरु
पोलिस नितीन याची चौकशी करत आहे. कॅनडीयन महिलेला कोटपुतळी येथील एका केअर सेंटरमध्ये पाठवले आहे. पोलिस या महिलेला कॅनेडा पाठविण्याची व्यवस्था देखील करत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की या प्रकरणाचा तपास सुरु आहे. सर्व अंगाने याची चौकशी केली जात असल्याचे ते म्हणाले.
