AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Neem Karoli Baba : ‘बुलावा आला’ म्हणत काजोलच्या बहिणीची कैंची धामला भेट; तनीषा मुखर्जीने शेअर केले खास फोटो

Neem Karoli Baba : 'हनुमान अंश' फिल्मची बरीच चर्चा सुरू आहे. याच दरम्यान अभिनेत्री तनिषा मुखर्जी हिने नीम करौली बाबा यांचं कैंची धाम गाठलं. तिने तिथले काही फोटोदेखील शेअर केलेत.

Neem Karoli Baba : ‘बुलावा आला’ म्हणत काजोलच्या बहिणीची कैंची धामला भेट;   तनीषा मुखर्जीने शेअर केले खास फोटो
| Updated on: Oct 07, 2026 | 3:49 PM
Share

Tanishaa Mukerji: ‘हनुमान अंश’ चित्रपटाच्या चर्चेनंतर तनीषा मुखर्जी हिने नीम करौली बाबांच्या कैंची धाम आश्रमाला भेट दिली. गेल्या काही दिवसांपासून चित्रपट पाहिल्यानंतर मोठ्या संख्येने भाविक कैंची धाममध्ये पोहोचत असल्याचे वृत्त समोर आले होते. वाढत्या गर्दीमुळे स्थानिकांना आणि भाविकांना काही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचीही चर्चा होती. मात्र, या पार्श्वभूमीवर तनीषा हिने श्रद्धेने आश्रमाला भेट देत नीम करौली बाबांचे दर्शन घेतले. तनीषाने मंगळवारी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर कैंची धाम भेटीचे तब्बल 10 फोटो शेअर केले. “कैंची धाममध्ये नीम करौली बाबांचे दर्शन घेतले. आयुष्य हा वेळेचा खेळ आहे. बुलावा येतो. ब्लेस्ड.” असं तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहीलं.

गर्दी पाहून चिंता

तनीषा हिने आपल्या पोस्टमध्ये कैंची धाममधील वाढत्या गर्दीचाही उल्लेख केला. तिने लिहिले की, “ मी 3 ऑक्टोबरच्या रील्स पाहिल्या होत्या. त्यामुळे तिथे किती गर्दी असेल, याची थोडी चिंता होती. पण बाबांवर विश्वास ठेवून आपणही समुद्रात नाव सोडली.” कैंची धामपासून गोलू देवतेच्या मंदिरापर्यंतचा प्रवास आणि पुढील अनुभवही तिने आपल्या पोस्टमध्ये शेअर केला. “जादुई” असं या संपूर्ण प्रवासाचे वर्णन तिने केलं.

‘हनुमान अंश’ची एवढी चर्चा का ?

‘हनुमान अंश’ हा चित्रपट नीम करौली बाबांच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगितलं जातं. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सुरुवातीच्या दोन आठवड्यांत त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, तिसऱ्या आठवड्यापासून चित्रपटाच्या कमाईला अचानक वेग आला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर 400 कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय केल्याचा दावा केला जात आहे.  चित्रपटाच्या लोकप्रियतेनंतर अनेक प्रेक्षक आणि भाविक नीम करौली बाबांशी संबंधित स्थळांना भेट देण्यासाठी उत्सुक झाले. त्याचा परिणाम कैंची धाममध्येही दिसून आला आणि गेल्या काही दिवसांत येथे मोठी गर्दी झाल्याचे वृत्त समोर आले.

दिग्दर्शकानेही केली होती भाविकांना विनंती

कैंची धाममध्ये वाढलेल्या गर्दीची माहिती समोर आल्यानंतर ‘हनुमान अंश’चे दिग्दर्शक आणि लेखक विशाल चतुर्वेदी यांनीही भाविकांना काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक भेट देण्याचे आवाहन केले होते. त्यांनी भक्तांनी केवळ कैंची धामवर गर्दी न करता नीम करौली बाबांशी संबंधित इतर ठिकाणांनाही भेट द्यावी, असे सुचवले होते.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...