AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठमोळ्या चित्रपटाला 3 वर्षे झाली, पण गाण्याची क्रेझ तसूभरही कमी नाही; आता आलं नवं व्हर्जन

3 वर्षांपूर्वी आलेल्या एका मराठी सिनेमातील गाण्याची क्रेझ आजही तरुणाईमध्ये कायम आहे. आता निर्मात्यांनी चाहत्यांसाठी त्याच गाण्याचं एक नवं Unreleased Version यूट्यूबवर आणलं आहे. मात्र, जुन्या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले असताना नव्या व्हर्जनला मात्र खूप थंड प्रतिसाद मिळाला,

मराठमोळ्या चित्रपटाला 3 वर्षे झाली, पण गाण्याची क्रेझ तसूभरही कमी नाही; आता आलं नवं व्हर्जन
Man Jhala Malhari Song Image Credit source: social media
| Updated on: Sep 29, 2026 | 11:52 PM
Share

मराठी सिनेमातली गाणी तशीही प्रेक्षकांच्या लगेच काळजाला भिडतात. चित्रपट चालो वा न चालो, गाणी मात्र वर्षानुवर्षे हिट राहतात. असंच काहीसं भाऊराव कऱ्हाडे यांच्या ‘टीडीएम’ (TDM) सिनेमाच्या बाबतीत झालंय. एप्रिल २०२३ ला हा सिनेमा आला होता. पण आज २०२६ मध्येही यातील ‘मन झालं मल्हारी’ गाण्याची क्रेझ तरुणाईमध्ये तशीच आहे. एकदम झकास असं हे रोमँटिक गाणं अजूनही लोकांच्या प्ले-लिस्टमध्ये टॉपला आहे.

गाण्यात नायक-नायिकेचं निरागस प्रेम आणि प्रेमासाठी थेट जेजुरीच्या खंडोबाला घातलेलं साकडं भलतंच भारी वाटतं. गावाकडचं रांगडं प्रेम, हळवेपणा आणि तो अस्सल देसी बाज यामुळे हे गाणं अगदी आपलंसं वाटतं. पृथ्वीराज आणि कालिंदी या नव्या जोडीचा साधा डान्स आणि गाण्याची सोपी स्टेप लोकांना एवढी आवडली की, कोणीही यावर सहज थिरकेल. म्हणूनच आजही या मूळ गाण्याला यूट्यूबवर ८ लाख प्लस (8 Lakh+) व्ह्यूज आहेत.

पण आता यात एक नवीन अपडेट आहे. निर्मात्यांनी चाहत्यांसाठी या गाण्याचं एक नवं ‘Unreleased version’ यूट्यूबवर टाकलं आहे. ज्यांना मूळ गाणं आवडलं होतं, त्यांच्यासाठी ही एकदम भारी पर्वणी आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ५ महिने झाले तरी या नव्या व्हिडीओला फक्त ४१ हजार व्ह्यूजच मिळालेत! जुन्या गाण्याला एवढं डोक्यावर घेणाऱ्या पब्लिकला बहुधा या नव्या व्हर्जनबद्दल अजून पत्ताच लागलेला नाहीये. कदाचित लोकांपर्यंत हे पोहोचलं नसेल, पण गाण्यात मात्र तीच जुनी जादू नक्कीच आहे.

वैभव शिरोळे आणि कुणाल गायकवाड यांनी लिहिलेल्या या गाण्याला आनंदी जोशी आणि वैभवनेच आपला भन्नाट आवाज दिलाय. ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ नंतर भाऊरावांच्या ‘टीडीएम’नेही गाण्यांच्या बाबतीत बाजी मारलीये. त्यांच्या सिनेमांतली मातीची नाळ इथंही पक्की दिसते. जर तुम्ही जुन्या गाण्याचे कट्टर फॅन असाल आणि ते आजही तुमच्या ओठांवर रेंगाळत असेल, तर यूट्यूबवर जाऊन हे नवं अनरिलीज्ड व्हर्जन आत्ताच नक्की पाहा.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप