Tejashri Pradhan : एखाद्या अभिनेत्याचा अभ्यास कमी पडेल…तेजश्री प्रधानने केलं ‘या’ इन्फ्लुएन्सरचं भरभरून कौतुक
अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने विविध विषयांवर चर्चा केली, मत मांडली. याच मुलाखतीत तेजश्री प्रधानला असा एक प्रश्न विचारण्यात आला, त्यावर तिने जे काही भन्नाट उत्तर दिलंय त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

प्रेक्षकमनावर आपल्या अभिनयाची छाप पाडून, मालिकाविश्वातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान सर्वांचीच लाडकी आहे. त्यामुळे घरा घरात तिचा चाहतावर्ग आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत ती सर्वांचीच लाडकी आहे. काही ना काही कारणावरून ती चर्चेत असतेच. सध्या झी मराठीवर ती वीण दोघांतली तुटेना या मालिकेत काम करत आहे.
अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने विविध विषयांवर चर्चा केली, मत मांडली. याच मुलाखतीत तेजश्री प्रधानला असा एक प्रश्न विचारण्यात आला, त्यावर तिने जे काही भन्नाट उत्तर दिलंय त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
आजकाल कलाकरांपेक्षा लोक सोशल मीडिया infulnecer चे जास्त फॅन असतात. कोणी infulnecer तर मग त्यासोबत फोटो, व्हिडिओ, ब्लॉग केले जातात.तेजश्रीने नुकतीच सिने तडका 2.0 ला मुलाखत दिली.अँकरने एक प्रश्न तेजश्रीला विचारला तो म्हणजे, ‘ एक कुठला असा infulnecer आहे का , जो तु्झ्या डोक्यामध्ये आता येईल कि हिची किंवा ह्याची आताच रिल बघितली आणि मला फार आवडली, किंवा हे नाव आहे जे माहिती आहे. असा प्रश्न अँकरने विचारला. त्यावर तेजश्री म्हणाली…
आपण आता रिजीनल लँग्वेजद्वारे भेटलोय त्यामुळे सांगते की, सायली राऊत इज माय फेव्हरेट, मला सायली राऊतचे व्हिडिओ बघायला इतके आवडतात आणि मी इतकी एन्जॉय करते. कारण ती जी जी कॅरेक्टर्स करत असते ना त्याचा एवढा तिचा अभ्यास असतो आणि एखाद्या अॅक्टरचा अभ्यास कमी पडेल, इतकी छान लकब तिने घेतलेली असते. मला जाम मजा येते.असं तेजश्री म्हणाली
यासोबतच तिने पुरूष infulnecer मध्ये कोण आवडतो तेही सांगितले, ती म्हणाली, ‘मला अर्थवचे सुदामेचे व्हिडिओ आवडतात. मला सुमितचे व्हिडिओ आवडतात. असं तेजश्री म्हणाली.