AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया; ‘मुंबई आता लवकरच..’

पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol and diesel rates) सातत्याने वाढ पहायला मिळतेय. आजदेखील (रविवार) हे दर 80 ते 85 पैशांनी वाढले आहेत. गेल्या 13 दिवसांत 11 वेळा ही दरवाढ (fuel prices hike) झाली आहे. या दरवाढीवरून विविध प्रतिक्रिया उमटत असताना, आंदोलनं होत असताना आता एका अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया; 'मुंबई आता लवकरच..'
Actress Sharmila ShindeImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 03, 2022 | 1:09 PM
Share

पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol and diesel rates) सातत्याने वाढ पहायला मिळतेय. आजदेखील (रविवार) हे दर 80 ते 85 पैशांनी वाढले आहेत. गेल्या 13 दिवसांत 11 वेळा ही दरवाढ (fuel prices hike) झाली आहे. या दरवाढीवरून विविध प्रतिक्रिया उमटत असताना, आंदोलनं होत असताना आता एका अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री शर्मिला शिंदे (Sharmila Shinde) हिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित इंधनाच्या दरवाढीवरून चिंता व्यक्त केली आहे. दरवाढ अशीच सुरू राहिली तर मुंबई लवकरच युरोपीयन शहरासारखी होईल, असंही मत तिने मांडलं. शर्मिलाने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मराठी आणि ‘मेरे साई’ या हिंदी मालिकेत काम केलं आहे.

शर्मिलाने देशातील महत्त्वाच्या शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच तिने लिहिलं, ‘सायकल खरेदी करावी लागेल. काय वाटतं? रस्त्यावर सायकलींसह मुंबईसुद्धा लवकरच युरोपीयन शहरासारखी दिसू लागली तर मला आश्चर्य वाटणार नाही.’

शर्मिलाची पोस्ट-

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरात काय आहे आजचा पेट्रोल आणि डिझेल दर

शहर          पेट्रोल         डिझेल

मुंबई             118           102 ठाणे             117.68      100.48 सातारा         118.63      101.33 सांगली         118.34      101.08 कोल्हापूर     118.51        101.25 लातूर           119.26       101.95 औरंगाबाद    119.78      102.45 नागपूर         118.44       101.18

शर्मिलाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. हॅरी पॉटरचा झाडू घेऊन फिरायला लागेल, असंही एकाने मस्करीत लिहिलं. तर काहींनी शर्मिला सायकल विकत घेण्याचा सल्ला दिला. ‘मी बाईक विकून सायकल घेतली’, असंही एका युजरने लिहिलं. ‘आता फक्त हाच पर्याय उरला आहे’, असं एकाने म्हटलं.

हेही वाचा:

Malaika Arora Accident: मलायकाला रुग्णालयातून डिस्चार्ज; तब्येतीत सुधारणा

Bade Achhe Lagte Hain 2: नकुल मेहता-दिशा परमारच्या ‘कंडोम’ सीनवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.