Malaika Arora Accident: मलायकाला रुग्णालयातून डिस्चार्ज; तब्येतीत सुधारणा

अभिनेत्री मलायका अरोराला (Malaika Arora) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शनिवारी झालेल्या कार अपघातानंतर तिला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबई-पुणे हायवेवर खालापूर टोल नाक्याजवळ (Khalapur toll naka) काही गाड्या एकमेकांना धडकल्या होत्या.

Malaika Arora Accident: मलायकाला रुग्णालयातून डिस्चार्ज; तब्येतीत सुधारणा
Malaika Arora Gets DischargedImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 12:15 PM

अभिनेत्री मलायका अरोराला (Malaika Arora) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शनिवारी झालेल्या कार अपघातानंतर तिला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबई-पुणे हायवेवर खालापूर टोल नाक्याजवळ (Khalapur toll naka) काही गाड्या एकमेकांना धडकल्या होत्या. दोन गाड्यांनी मलायकाला रेंज रोव्हरला धडक दिली होती. या अपघातात मलायकाच्या कपाळाला किरकोळ दुखापत झाली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिची प्रकृती ठीक असून सीटी स्कॅनच्या रिपोर्टमध्येही काही आढळलं नाही अशी माहिती डॉक्टरांनी दिली. मलायकाची बहीण अमृता अरोरानेही माध्यमांना तिच्या प्रकृतीविषयीची माहिती दिली. ‘मलायका बरी होतेय’, असं तिने सांगितलं. मलायका पुण्याहून मुंबईला परत येताना तिच्या कारचा अपघात झाला.(Malaika Arora Accident)

खालापूर टोलनाक्याजवळ तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. यापैकी दोन पर्यटकांच्या गाड्या होत्या. या दोन गाड्यांनी मलायकाच्या रेंज रोव्हरला धडक दिली. अपघातप्रवण क्षेत्रातच हा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. “मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 38 किमी अंतरावर हा अपघात झाला आहे. यात तिनही वाहनांचं नुकसान झालं. अपघातानंतर ड्राइव्हरने ताबडतोब तिथून पळ काढला. तर इतर अपघातग्रस्तांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. संबंधित अपघाताबाबत चौकशी करून एफआयआर नोंदविला जाईल”, अशी माहिती पोलिसांनी दिली.

इन्स्टा पोस्ट-

“अपघातातील तिन्ही गाड्यांचे नोंदणी क्रमांक मिळाले असून प्रत्यक्षात काय घडलं, हे समजून घेण्यासाठी मालकांशी संपर्क साधू. त्यानंतर एफआयआर नोंदविला जाईल”, असं खोपोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर म्हणाले.

हेही वाचा:

‘असले घाण आरोपही कोणी लावू नका’; म्हणत विशाखा सुभेदारने घेतला मोठा निर्णय

अडीच तासांचा शाहरुखचा Pathaan चित्रपट युट्यूबवर लीक? नेमकं काय आहे प्रकरण

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.