Bigg Boss Marathi 3 | अलका कुबल ते गायत्री दातार, पाहा कोणाकोणाला झाली ‘बिग बॉस मराठी 3’साठी विचारणा

बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या पर्वाची नांदी झाली आहे. 19 सप्टेंबरला ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रिमिअर होणार आहे. दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरच यंदाही सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Bigg Boss Marathi 3 | अलका कुबल ते गायत्री दातार, पाहा कोणाकोणाला झाली ‘बिग बॉस मराठी 3’साठी विचारणा
Bigg Boss Marathi 3

मुंबई : बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या पर्वाची नांदी झाली आहे. 19 सप्टेंबरला ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रिमिअर होणार आहे. दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरच यंदाही सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘कलर्स मराठी’वर बिग बॉसचा शानदार प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरात कोण दिसणार, याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरु लागली आहे. यापैकी अशी काही नावं देखील समोर आली आहेत, ज्यांना यावेळी घरात जाण्यासाठी विचारणा करण्यात आली आहे.

19 सप्टेंबरला संध्याकाळी सात वाजता ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रिमिअर होणार आहे. त्यानंतर दररोज रात्री साडेनऊ वाजता प्रेक्षकांना हा शो पाहता येणार आहे. शंभर दिवस वेगवेगळ्या क्षेत्रातील 15 सेलिब्रिटी ‘बिग बॉस’च्या घरात एकत्र बंदिस्त होतील. अनलॉक एंटरटेनमेंट अशी बिग बॉसच्या नव्या सिझनची थीम आहे. महेश मांजरेकर प्रकृतीच्या कारणास्तव बिग बॉसचं सूत्रसंचालन करतील की नाही, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र प्रोमोमध्ये मांजरेकरांचं दर्शन घडल्याने चाहत्यांनाही दिलासा मिळाला आहे.

कोणाकोणाला झाली विचारणा?

‘बिग बॉस मराठी 3’च्या आलिशान घरात राहण्यासाठी काही कलाकारांना विचारणा झाल्याची माहिती समोर येत आहे. या कलाकारांमध्ये अभिनेत्री अलका कुबल यांचा देखील समवेश आहे. अलका कुबल यांनी यंदाचा सीझनमध्ये या घरात प्रवेश करावा यासाठी त्यांना ही ऑफर देण्यात आली होती. तर. ‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्री गायत्री दातार हिला देखील ‘बिग बॉस मराठी 3’साठी विचारणा करण्यात आली आहे. दुसरीकडे, आगरी कोळी गीतांचे बादशाह अशी ज्यांची ओळख आहे, ते गायक संतोष चौधरी देखील या पर्वात दिसणार असल्याची चर्चा सुरु आहे.

याव्यतिरिक्त ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतील ‘अपर्णा’ अर्थात अभिनेत्री अंकिता निक्रड ही देखील यंदाच्या पर्वाचा भाग असणार असल्याचे कळते आहे. सध्या ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतून ‘अपर्णा’च्या पात्राला तात्पुरते बाहेर करण्यात आले आहे. त्यामुळे ही अभिनेत्री आता बिग बॉसच्या घरत दिसण्याची शक्यता वाढली आहे.

आणखी कोणाकोणाची नावं चर्चेत?

या कलाकारांव्यतिरिक्त ‘देवमाणूस’ मालिकेतील एसीपी दिव्या सिंहच्या भूमिकेने लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली अभिनेत्री नेहा खानपासून ‘अग्गंबाई सासूबाई’मुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री तेजश्री प्रधान यांची नावंही चर्चेत आहेत. अक्षया देवधर, संग्राम समेळ, पल्लवी सुभाष, रसिका सुनील, केतकी चितळे, चिन्मय उदगीरकर, ऋषी सक्सेना, नेहा जोशी, अंशुमन विचारे, किशोरी आंबिये यासारख्या कलाकारांनाही या शोसाठी विचारणा झाल्याचं बोललं जातं आहे.

यावेळी घरात होणार मोठे बदल!

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे यावेळी ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात मोठे बदल दिसून येणार आहेत. कोरोना विषाणूवर आधारित काही तस्क यावेळी या घरातील स्पर्धकांना देण्यात येणार आहेत. केवळ मनोरंजनच नाही तर, यंदा स्पर्धक प्रेक्षकांना हात धुणे, मास्क वापरणे आणि सोशल डिस्टेंसिंग सारखे नियम समजावून लोकांचे प्रबोधन करणार आहेत. यासाठी स्पर्धकांना भन्नाट टास्क देण्यात येणार आहेत.

हेही वाचा :

पायल रोहतगी पुन्हा वादात अडकली, पुणे पोलिसांनी दाखल केला गुन्हा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

‘चला हवा येऊ द्या’ फेम ‘या’ अभिनेत्रीची ऐतिहासिक ‘रावरंभा’ चित्रपटात वर्णी, आता मोठ्या पडद्यावर दाखवणार अभिनयाची जादू!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI