AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चला हवा येऊ द्या’ फेम ‘या’ अभिनेत्रीची ऐतिहासिक ‘रावरंभा’ चित्रपटात वर्णी, आता मोठ्या पडद्यावर दाखवणार अभिनयाची जादू!

येत्या काळात अनेक ऐतिहासिक चित्रपट येऊ घातले आहेत. त्यातून शिवकालातील कथानकं रुपेरी पडद्यावर पहायला मिळेल. अनुप अशोक जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ (Ravrambha)  हा चित्रपट त्या सर्व ऐतिहासिक चित्रपटांमध्ये वेगळा ठरणार आहे.

‘चला हवा येऊ द्या’ फेम ‘या’ अभिनेत्रीची ऐतिहासिक ‘रावरंभा’ चित्रपटात वर्णी, आता मोठ्या पडद्यावर दाखवणार अभिनयाची जादू!
मोनालिसा बागल
| Edited By: | Updated on: Sep 01, 2021 | 1:38 PM
Share

मुंबई : येत्या काळात अनेक ऐतिहासिक चित्रपट येऊ घातले आहेत. त्यातून शिवकालातील कथानकं रुपेरी पडद्यावर पहायला मिळेल. अनुप अशोक जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ (Ravrambha)  हा चित्रपट त्या सर्व ऐतिहासिक चित्रपटांमध्ये वेगळा ठरणार आहे. ‘रावरंभा’तून एक ऐतिहासिक प्रेमकहाणी (historical love story) उलगडणार आहे. विशेष म्हणजे मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या  राजधानी सातारा जिल्ह्यात निर्मिती होणारा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटात आता ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्री मोनालिसा बागल (Monalisa Bagal) हिची वर्णी लागली आहे.

अभिनेत्री मोनालिसा बगल हिने छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. याआधी मोनालिसा बागलने ‘प्रेम संकट’, ‘झाला बोभाटा’, ‘परफ्यूम’, ‘ड्राय डे’ आदी सिनेमांतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘टोटल हुबलाक’ या मालिकेत तिने प्रमुख भूमिका साकारली होती.

शशिकांत पवार प्रॉडक्शन्सचे शशिकांत शीला भाऊसाहेब पवार हे ‘रावरंभा : द ग्रेट वॉरियर ऑफ 1674’ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘बेभान’, ‘झाला बोभाटा’, ‘भिरकीट’, ‘करंट’ असे उत्तम चित्रपट केलेले अनुप अशोक जगदाळे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. ऐतिहासिक कथानक मांडण्यात हातखंडा असलेल्या प्रताप गंगावणे यांनी ‘रावरंभा’चं लेखन केलं आहे.

काय असणार कथा?

इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये ‘रावरंभा’ ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही दडली आहे. ही प्रेमकहाणीच ‘रावरंभा’ या चित्रपटातून पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पार्श्वभूमीवर उभा असलेला मावळा या पोस्टरवर दिसत असून अतिशय लक्षवेधी असं हे पोस्टर आहे. त्यामुळे आकर्षक नाव आणि लक्षवेधी पोस्टर यामुळे चित्रपटाविषयी नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

कोण होते रावरंभा?

रावरंभा हे फलटणचे बजाजी निंबाळकर यांचे पुत्र महादजी यांचे ते पुत्र होते. त्यांच्याबद्दल आपल्याला फारसं माहिती नसलं, तरी त्यांचा कार्यकाळ खूप मोठा आहे. इतिहासाच्या अनेक महत्वाच्या घटनांमध्ये त्यांचा उल्लेख आढळतो. 18व्या शतकात मराठ्यांच्या इतिहासात निंबाळकर हे घराणं खूपचं प्रसिद्ध होतं. त्यांनी मराठ्यांच्या शिरात मानाचा तुरा रोवणाऱ्या अनेक मोठ्या कामिगिरी केल्या आहेत.

1707 मध्ये रावरंभा निंबाळकर यांनी धनाजी यांचं मार्गदर्शन घेतं, औरंगजेब याच्या छावणीवर हल्ला केला होता. रावरंभा यांना निजामाने ‘रावरंभा’ ही पदवी दिल्याचं आढळतं. रावरंभा म्हणजे सतत जिंकणारा असं त्याचा अर्थ होतो. त्यांचं मूळ नाव ‘रंभाची बाजी’ असं होतं. रावरंभा हे देवीचे मोठे भक्त असल्याचं सुद्धा आढळतं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत तुळजापूरमध्ये मंदिराजवळ तटबंदी आणि दरवाजेसुद्धा बांधले आहेत. चित्रिकरणाला सुरुवात झालेलं पोस्टर पाहून चाहत्यांना या ऐतिहासिक चित्रपटाची उत्कंठा लागून राहिली आहे.

हेही  वाचा :

Shruti Marathe : श्रुती मराठेचा हटके ‘बॉर्बी डॉल’ लूक पाहिला का?; फोटो पाहून फॅन्स म्हणाले…

अरुंधती पुन्हा देशमुखांचं घर सोडणार की ‘समृद्धी’तच नांदणार? ‘आई कुठे काय करते’ मालिकेत येणार नवा ट्वीस्ट!

काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.