रुपाली चाकणकरांकडून नाव, फोटो, शैलीचा ट्रेडमार्क, महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपट अडचणीत, थेट दिपाली सय्यद..
रुपाली चाकणकर यांच्याकडून मोठे पाऊल उचलण्यात आले. त्याचे नाव फोटो आणि वैयक्तिक शैलीचे केले ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करण्यात आले. पूर्वपरवानगीशिवाय नाव किंवा फोटो वापरल्यास कठोर कायदेशीर कारवाई होणार आहे.

अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले होते. यादरम्यानच काही धक्कादायक व्हिडीओही पुढे आली. तसेच खरात हा आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत होता, याच्या मदतीने त्याने करोडोंची माया जमवली. यावरच महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स नावाने चित्रपट येत आहे. या चित्रपटात रुपाली चाकणकर यांची भूमिका दिपाली सय्यद निभावत आहेत. हुबेहुब रुपाली चाकणकर यांच्यासारखा अभिनय करताना दिपाली सय्यद दिसत आहेत. बोलण्याची स्टाईलही सेम आहे. अशोक खरात प्रकरणात नाव आल्याने चाकणकर यांना थेट आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. हेच नाही तर त्यांच्यावर गंभीर आरोपही करण्यात आली. त्यातच आता रुपाली चाकणकर यांनी मोठे पाऊल उचलले आहे.
रुपाली चाकणकरांकडून नाव, फोटो आणि वैयक्तिक शैलीचे केले ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करण्यात आले. पूर्वपरवानगीशिवाय नाव किंवा फोटो वापरल्यास कठोर कायदेशीर कारवाई होणार आहे. रील, व्हिडिओ किंवा प्रमोशनसाठी वापर केल्यास फौजदारी आणि दिवाणी गुन्हा दाखल होणार आहे.
रुपाली चाकणकरांची एक्स पोस्टद्वार माहिती
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आता आपले नाव, फोटो आणि वैयक्तिक शैलीचे अधिकृत ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन केले आहे. त्यामुळे आता कोणीही त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांचा फोटो, नाव किंवा शैलीचा वापर रील्स, व्हिडिओ किंवा प्रमोशनसाठी केल्यास थेट फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
चाकणकर यांच्या एक्स पोस्टमध्ये नक्की काय वाचा..
माझे नाव, माझा फोटो, माझी ओळख, माझी वैयक्तिक शैली आणि स्वतःला सादर करण्याची माझी विशिष्ट पद्धत यासंदर्भात ट्रेडमार्क नोंदणी करण्यात आलेली आहे. माझ्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही माझे नाव, फोटो, ओळख किंवा माझ्या विशिष्ट शैलीचा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा व्यावसायिक कारणासाठी कोणत्याही प्रकारचे फोटो, व्हिडिओ, फिल्म, रील, टीझर, प्रमोशन किंवा इतर कोणतेही साहित्य तयार करण्यासाठी, वापरण्यासाठी किंवा प्रसिद्ध करण्यासाठी वापर केल्यास अशा व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.असे आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर साहित्य जप्त करण्याची मागणी केली जाईल आणि संबंधित व्यक्तीला फौजदारी तसेच दिवाणी कायदेशीर कारवाईला व शिक्षेला सामोरे जावे लागेल.
