AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी सुषमा अंधारेंचे ट्वीट, म्हणाल्या चाकणकर ताईंच्या…

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांच्यावर अघोरी विद्येचा वापर केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी सुषमा अंधारेंचे ट्वीट, म्हणाल्या चाकणकर ताईंच्या...
Sushma Andhare Rupali Chakankar
| Updated on: Mar 24, 2026 | 1:49 PM
Share

महाराष्ट्रात सध्या भोंदू बाबा अशोक खरातचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणी सध्या अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्यातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. रुपाली चाकणकर यांच्या बोटाला झालेली जखम आणि सुनील तटकरे यांच्या बोटाला झालेल्या जखमेवरुन सुषमा अंधारेंनी निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे यांनी हा किती मोठा योगायोग असा टोला लगावला आहे.

नेमकं प्रकरण काय?

अध्यात्म आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या अशोक खरातचे काळे कारनामे उघड झाले आहेत. या भोंदू बाबाचे अनेक बड्या नेत्यांशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यातच रुपाली चाकणकर या अशोक खरातला गुरु मानत असल्याचा आरोप झाल्यानंतर वादाला आणखी पेव फुटले. यानंतर रुपाली चाकणकर यांच्या तर्जनीच्या बोटाला जखम झाल्याचे फोटो समोर आले होते. तशाचप्रकारे सुनील तटकरे यांचेही फोटो व्हायरल झाले होते. यावरुन सुषमा अंधारे यांनी तर थेट चाकणकर या तंत्र-मंत्र विद्या करायच्या असा आरोप चाकणकरांवर केला होता.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

आता यावर सुषमा अंधारे यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. याद्वारे त्यांनी जोरदार टीका केली आहे. अध्यक्षपदावरुन पायउतार झाल्यानंतर रुपाली चाकणकरांना तब्बल ४ दिवसांनी नेमकं त्यांच्या अनामिकेला काय झालं होतं, त्याचं कारण आता सुचलेले आहे. त्यांचं व्हॉटसअॅप स्टेटस आणि बातम्या या सर्व गोष्टींवरुन जाणवतंय की म्हणे त्यांच्या अनामिकेला दरवाज्यात अडकल्याने जखम झाली. साधारण दरवाज्यात माणसाचा अंगठा, तर्जन किंवा करंगळी अडकू शकते. मला जेवढं काही त्याच्यातलं कळत त्यानुसार…, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

पण काय योगायोग की चाकणकरांच्या अनामिकेला दरवाजामुळे जखम झाली. आताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितलं की त्यांच्या तर्जनीला सुद्धा दरवाज्यात अडकल्यामुळेच जखम झाली. एकूण काय, हातातले गंडेदोरे काय, ईशान्यश्वराची पूजा काय, बोटाला होणारी जखम काय आणि नेमकी ती जखम दरवाजात अडकून होते, हा सर्वच किती योगायोग आहे. कमाल आहे, असा टोलाही सुषमा अंधारेंनी लगावला.

चाकणकरांचा कार्यकर्ता सांगत आहे की ताईंच्या दरवाज्यात बोट अडकून जखम झाली. ताई आमच्याकडे त्यादिवशी आरतीला आल्या होत्या पण काय गंमत आहे की चाकणकर स्वतः सांगतात दोन तारखेला त्या अजितदादांच्या दौऱ्यामध्ये होत्या काय खरं काय खोटं ईशान्येश्वराला आणि खरातांनाच माहिती.. पण हा किती मोठा योगायोग आहे की तटकरेंच्या बोटाला झालेली जखम सुद्धा दरवाजात अडकूनच झाली, असेही सुषमा अंधारेंनी ट्वीट करताना म्हटले आहे. त्यामुळे आता याप्रकरणी विविध चर्चांना उधाण आले आहे.

Follow Us
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....