WITT 2026 : भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने – PM मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज TV9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ (WITT) समिटमध्ये सहभागी होऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. मागील दोन समिटप्रमाणे यंदाही त्यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या भाषणात मोदींनी जागतिक परिस्थितीवर भाष्य करत सांगितले की, २८ तारखेपासून जगभरात अनेक बदल आणि संकटे सुरू झाली आहेत. या कठीण काळात भारताने शांतपणे आणि ठामपणे पावले उचलली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज TV9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ (WITT) समिटमध्ये सहभागी होऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. मागील दोन समिटप्रमाणे यंदाही त्यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या भाषणात मोदींनी जागतिक परिस्थितीवर भाष्य करत सांगितले की, २८ तारखेपासून जगभरात अनेक बदल आणि संकटे सुरू झाली आहेत. या कठीण काळात भारताने शांतपणे आणि ठामपणे पावले उचलली आहेत. गेल्या २३ दिवसांत भारताने आपली निर्णयक्षमता, संकट व्यवस्थापन क्षमता आणि संबंध निर्माण करण्याची क्षमता दाखवली आहे. मोदी म्हणाले की, आज जग विखुरलं आहे, पण भारताने विविध देशांशी मजबूत संबंध तयार केले आहेत. गल्फमधील देशांपासून ते जागतिक देशांपर्यंत, ग्लोबल साऊथमधून शेजारी देशांपर्यंत, भारत सर्वांचा विश्वासू भागीदार ठरला आहे. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, “काही लोक विचारतात तुम्ही कुणाच्या बाजूने आहात. त्यांचे उत्तर सोपे आहे – आम्ही भारताच्या बाजूने आहोत, शांततेच्या बाजूने आहोत, संवादाच्या बाजूने आहोत आणि भारताच्या हितासाठी काम करत आहोत.”
Published on: Mar 23, 2026 10:38 PM
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार

