Narendra Modi | PM मोदींची WITT समिटमध्ये काँग्रेसवर सडकून टीका; काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ (WITT) समिटमध्ये भाषण दिले. त्यांनी भारताच्या आगामी वाटचालीवर प्रकाश टाकला आणि युद्धाच्या परिस्थितीत भारताची भूमिका स्पष्ट केली. मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसच्या काळात अनेक चुकीचे निर्णय घेण्यात आले ज्यामुळे देशाला मोठे आर्थिक नुकसान झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ (WITT) समिटमध्ये भाषण दिले. त्यांनी भारताच्या आगामी वाटचालीवर प्रकाश टाकला आणि युद्धाच्या परिस्थितीत भारताची भूमिका स्पष्ट केली. मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसच्या काळात अनेक चुकीचे निर्णय घेण्यात आले ज्यामुळे देशाला मोठे आर्थिक नुकसान झाले. विशेषतः २००४ ते २०१० या काळात पेट्रोल-डिझेल संकट निर्माण झाले, आणि काँग्रेसने १ लाख ४८ हजार कोटी रुपयांचे ऑईल बाँड जारी करून येणाऱ्या पिढीवर कर्जाचा बोजा टाकला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही याचा विरोध केला होता, परंतु रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या सरकारने सत्ता टिकवण्यासाठी हा निर्णय घेतला. मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने गेल्या पाच- सहा वर्षांत काँग्रेसच्या चुकीचे परिणाम कमी करण्यासाठी काम केले, पण खर्च अधिक आला कारण व्याजही भरावे लागले. काँग्रेसचे नेते आता भाषणांची “मिसाईल” सोडतात, पण या विषयावर बोलताना त्यांची बोलती बंद होते. मोदींनी स्पष्ट केले की, राजकारणात वैयक्तिक स्वार्थ आल्यास देशाच्या हिताऐवजी स्वतःचा विचार केला जातो, आणि भारत ठामपणे राष्ट्रहितासाठी काम करत आहे.
Published on: Mar 23, 2026 10:55 PM
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..

