AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहेत गालिबफ? ज्यांच्या नावावर थांबू शकतं हे भीषण युद्ध, अमेरिकेने त्यांना सुप्रीम लीडर बनवण्यासाठी टाकला डाव

Iran-US War Update : अमेरिकेला मध्य पूर्वेतील युद्धातून आता बाहेर पडायचं आहे. त्यासाठी त्यांनी पडद्यामागून हालचाली सुरु केल्या आहेत. अमेरिकची युद्धनिती आता तहाकडे झुकण्याची वेळ आल्याचे संकेत देत आहे. अमेरिका ज्या गालिबफ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे ते कोण आहेत?

कोण आहेत गालिबफ? ज्यांच्या नावावर थांबू शकतं हे भीषण युद्ध, अमेरिकेने त्यांना सुप्रीम लीडर बनवण्यासाठी टाकला डाव
mb ghalibaf
| Updated on: Mar 24, 2026 | 1:50 PM
Share

अमेरिका आणि इराणमध्ये पडद्यामागे काय घडतय? या बद्दल सस्पेन्स कायम आहे. एकाबाजूला अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चा सुरु झाल्याचा दावा केलाय. दुसरीकडे इराणने म्हटलय की, आमची अमेरिकेसोबत कुठलीही चर्चा सुरु नाहीय. या दरम्यान सीजफायरवरुन अमेरिकेच्या एका प्लानचा खुलासा झाला आहे. अमेरिका इराणमधल्या एका कट्टरपंथीयाला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्यासाठी त्याने काम करावं अशी अमेरिकेची इच्छा आहे. यासाठी ट्रम्प प्रशासन त्या अधिकाऱ्याची मनधरणी करत आहे. या अधिकाऱ्याचं नाव आहे, मोहम्मद बी गालिबफ.

ट्रम्प प्रशासन गालिबफला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत आहे असं अमेरिकी मीडिया आउटलेट एक्सियोसने व्हाइट हाऊसमधील सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे. गालिबफच्या मदतीनेच इराणमधील आपलं हित साधलं जाऊ शकतं, असं ट्रम्प प्रशानसाला वाटतय. गालिबफ सोबत चर्चेसाठी राष्ट्रपती ट्रम्प उपराष्ट्रपती जेडी वेन्स यांना पाठवायलाही तयार आहेत.

कोण आहेत गालिबफ?

गालिबफ इराणमधील कट्टरपंथीय विचारधारेचा नेता मानला जातो. सध्या ते इराणी संसदेत स्पीकर आहेत. त्यांना इराणचे दुसरे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांचं विश्वासू मानलं जायचं. गालिबफ यांनी इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्डमधील एक जवान म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केलेली. या गार्ड्सचे जनरल म्हणूनही त्यांनी काम केलय. सैन्यातून बाहेर पडल्यानंतर गालिबफ यांना तेहरानचे महापौर म्हणून नियुक्त करण्यात आलं.

गालिबफ किती वेळा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हरले?

गालिबफ यांनी दोनवेळा इराणच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली आहे. 2013 साली पहिल्यांदा गालिबफ राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरले होते. पण त्यावेळी रुहानी यांनी त्यांचा पराभव केला. 2024 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही गालिबफ मसूद पजेशकियन यांच्याकडून निवडणूक हरले.

अमेरिकी सुरक्षा एजन्सीजनुसार गालिबफ असे एकमेव नेते आहेत, जे मुज्तबा खामेनेईच्या निर्णयात दखल देऊ शकतात. खामेनेई ज्यांचं म्हणणं ऐकू शकतात. म्हणूनच अमेरिका गालिबफ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.

गालिबफने स्वत: काय म्हटलय?

पॉलिटिकोनुसार अमेरिकी प्रशासनाला गालिबफ सुप्रीम लीडर म्हणून मान्य आहेत. मुज्तबाच्या जागी गालिबफला सुप्रीम लीडर बनवावं अशी अमेरिकेची इच्छा आहे. सोमवारी 23 मार्च रोजी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी सांगितलं की, ‘इराणच्या सुप्रीम लीडरसोबत मिळून होर्मुजवर कंट्रोल करणार’ ट्रम्प यांना जास्त प्रश्न विचारल्यावर ते बोलले की, ‘मी जास्त काही सांगू शकत नाही, कारण त्याला मारलं जाऊ शकतं’ अमेरिकी मीडियामध्ये ट्रम्प प्रशासनाची गालिबफ यांच्याशी चर्चा सुरु असल्याची बातमी वेगाने पसरली. त्यानंतर गालिबफने स्वत: सोशल मीडियावर येऊन अशी कुठलीही चर्चा सुरु नसल्याचा दावा केला.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.