AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran US War Upate : इराणसाठी वाईट बातमी, अजून वाट लागणार, आणखी दोन देश युद्धात उतरण्याचा निर्णय घेण्याच्या समीप

Iran War Upate : इराणही डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्टेटमेंटवर विश्वास ठेवायला नाहीय. हे अमेरिकेचं षडयंत्र आहे असच त्यांना वाटतय. अमेरिकेला तेलाच्या किंमती खाली पाडायच्या आहेत आणि हल्ल्यासाठी वेळ हवा आहे, यासाठी ट्रम्प हे बोलतायत असा एक मतप्रवाह आहे.

Iran US War Upate : इराणसाठी वाईट बातमी, अजून वाट लागणार, आणखी दोन देश युद्धात उतरण्याचा निर्णय घेण्याच्या समीप
US-Iran-Israel
| Updated on: Mar 24, 2026 | 1:51 PM
Share

इराण विरुद्ध सुरु असलेल्या युद्धात काल अचानक डोनाल्ड ट्रम्प यांनी यू-टर्न घेतला. आमची इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरु आहे. पुढचे पाच दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले होणार नाहीत, असं ट्रम्प यांनी अचानक जाहीर केलं. त्याच्याआधी याच ट्रम्प यांनी इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुज खुलं केलं नाही तर इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करुन इराणमध्ये ब्लॅकआऊट करु अशी धमकी दिली होती. त्यासाठी ट्रम्प यांनी इराणला 48 तासांची मुदत दिली होती. ही मुदत काल संपणार होती. त्याचवेळी अचानक ट्रम्प यांनी पाच दिवसाच्या मर्यादीत युद्ध विरामाचं स्टेटमेंट केलं. ट्रम्प यांच्यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नाहीय. करण ट्रम्प बोलतात एक आणि करतात दुसरं हे आतापर्यंत अनेकदा दिसून आलय. डोनाल्ड ट्रम्प यांचं हे विधान म्हणजे अमेरिकेची कुठली नवीन स्ट्रॅटजी तर नाही ना? अशी भिती अनेकांच्या मनात आहे.

इराणही डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्टेटमेंटवर विश्वास ठेवायला नाहीय. हे अमेरिकेचं षडयंत्र आहे असच त्यांना वाटतय. अमेरिकेला तेलाच्या किंमती खाली पाडायच्या आहेत आणि हल्ल्यासाठी वेळ हवा आहे, यासाठी ट्रम्प हे बोलतायत असा एक मतप्रवाह आहे. पुढे काय घडणार ते लवकरच स्पष्ट होईलच. पण इराणसाठी एक वाईट बातमी आहे. आखाती देशांमधील अमेरिकेचे मित्र देश सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात म्हणजे UAE हे इराण विरुद्ध युद्धात सहभागी होऊ शकतात.

आतापर्यंत संयम बाळगला

आतापर्यंत सौदी अरेबिया, UAE हे देश संयम बाळगून आहेत. इराणने त्यांच्यावर हल्ले केले. पण त्यांनी फक्त स्वत:चा बचाव केला. प्रत्युत्तर दिलं नाही. पण आता रिपोर्ट असे आहेत की हे दोन्ही देश इराण विरुद्ध युद्धात सहभागी होऊ शकतात. इराण विरुद्ध लष्करी कारवाईचं समर्थन करण्याच्या निर्णयाच्या जवळपास हे देश पोहोचले आहेत. इराणकडून सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे आखाती देशांची अर्थव्यवस्था बाधित झाली आहे. त्यांच्या सुरक्षित देशाच्या प्रतिष्ठेला तडा गेलाय. अनेक परदेशी नागरिक आपला देश सोडून मायदेशी परतले आहेत. स्ट्रेट ऑफ हॉर्मुज इराणने रोखून धरल्याने त्यांच्या बिझनेसला धोका निर्माण झालाय. त्यामुळे हे देश आता युद्धात सहभागी होण्याच्या निर्णयाच्या समीप पोहोचले आहेत.

ते असा निर्णय घेऊ शकतात

द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार दोन्ही देश अमेरिका-इस्रायलच्या एअर स्ट्राइकच समर्थन करु शकतात. इराणच्या फायनान्शिअल नेटवर्कवर दबाव आणू शकतात. या युद्धात आपलं सैन्य उतरवण्यासाठी हे दोन्ही देश अजून कटिबद्ध नाहीयत. पण इराणच्या सततच्या हल्ल्यांमुळे ते असा निर्णय घेऊ शकतात.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.