AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : इराण विरुद्ध युद्ध सुरु करण्यासाठी इतकं कोणी भडकवलं? अखेर ट्रम्प यांच्याकडून त्या व्यक्तीचं नाव जाहीर

Donald Trump : अमेरिकेने इराण विरुद्ध इतका टोकाचा युद्धाचा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. सुरुवातीला यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना जबाबदार धरलं जात होतं. पण आता स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या व्यक्तीचं नाव जाहीर केलय. ज्यांनी त्यांना पहिला युद्ध करण्याचा सल्ला दिला.

Donald Trump : इराण विरुद्ध युद्ध सुरु करण्यासाठी इतकं कोणी भडकवलं? अखेर ट्रम्प यांच्याकडून त्या व्यक्तीचं नाव जाहीर
Donald Trump
| Updated on: Mar 24, 2026 | 1:51 PM
Share

इराण विरुद्ध युद्ध सुरु केल्यापासून अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सतत वेगवेगळी स्टेटमेंट करत आहेत. इस्रायलसोबत मिळून ट्रम्प यांनी इराणचे सुप्रीम लीडर खामेनीसह अन्य नेत्यांचा खात्मा केला. आधी असं म्हटलं जात होतं की, ट्रम्प यांना इराणवर हल्ला करण्यासाठी बेंजामिन नेतन्याहू यांनी भडकवलं. पण आता ट्रम्प यांनी त्या व्यक्तीचं नाव सांगितलय, ज्यांनी युद्ध सुरु करण्यासाठी त्यांना प्रेरित केलं. ट्रम्प यांनी मिडिया समोर सांगितलं की, ‘अमेरिकी वॉर सेक्रेटरी पीट हेगसेथ यांनी त्यांना युद्ध सुरु करण्याचा सल्ला दिला’ ते ट्रम्प यांना असा सल्ला देणारे पहिले व्यक्ती आहेत. दिग्गज मंत्र्यांसमोर मी इराणबद्दलची चिंता व्यक्त केली होती असं ट्रम्प म्हणाले.

“मी पीटला फोन केला. मी जनरलला फोन केला. मी अनेक महान लोकांना फोन केले. आमच्याकडे महान माणसं आहेत. मी म्हटलं, चला बोलूया. मिडिल-ईस्ट आमच्यासमोर एक समस्या आहे. इराण नावाचा देश मागच्या 47 वर्षांपासून दहशत पसरवतोय. अणवस्त्र बनवण्याच्या ते खूप जवळ आहेत” असं ट्रम्प म्हणाले. “मी माझ्या नेत्यांना बोललो की, अमेरिका एकतर पुढे जाऊ शकते किंवा 50,000 ची संख्या 55 आणि 60 पर्यंत पोहोचू शकते किंवा अमेरिका थांबू शकते” असं ट्रम्प म्हणाले.

अजून ट्रम्प काय बोलले?

“पीट मला असं वाटतं की, तुम्ही असे पहिले व्यक्ती होता, ज्यांनी आवाज उठवला आणि म्हणाला चला असं करुया. तुम्ही त्यांना अणवस्त्र बनवायला देऊ शकत नाही. आता आमची चांगली चर्चा चाललीय. हे काल रात्री किंवा त्याच्या आदल्या रात्री सुरु झालय” असं ट्रम्प म्हणाले. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे 28 फेब्रुवारीला इराणवर हल्ला केला. पहिल्याच दिवशी बॉम्बफेकीत इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. युद्ध सुरु होऊन आता 25 दिवस झालेत. इराणमधील अनेक दिग्गज नेत्यांचा मृत्यू झालाय.

हे षडयंत्र असल्याचं इराणचं म्हणणं

अमेरिकेने इराण विरुद्ध युद्ध सुरु केलं. आज 25 दिवस झालेत. पण या युद्धातून अमेरिका-इस्रायलला अपेक्षित परिणाम आलेले नाहीत. त्यामुळे मायदेशासह जगभरातून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका होत आहे. सध्या इराण अमेरिकेसमोर मजबूत स्थितीत उभा आहे. अमेरिकेच्या प्रत्येक हल्ल्याला जशास तसं उत्तर देतोय. डोनाल्ड ट्रम्प यांनी काल अचानक आता पुढचे पाच दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करणार नाही. त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा सुरु आहे असं जाहीर केलं. त्यांची ही घोषणा स्वत: इराणने नाकारलीय. हे षडयंत्र असल्याचं इराणचं म्हणणं आहे. आता नेमकं पुढे काय होतं ते येणाऱ्या दिवसात स्पष्ट होईलच.

Follow Us
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार