AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-US War Update : इराण-अमेरिकेला एका टेबलावर आणण्यासाठी पडद्यामागे भारताचाही महत्वाचा रोल! आंतरराष्ट्रीय मीडियाकडून खुलासा

Iran-US War Update : सध्या सगळ्या जगाचं लक्ष इराण विरुद्ध सुरु असलेल्या युद्धावर आहे. काहीही करुन हे युद्ध थांबावं असा प्रयत्न जगातील अनेक देशांकडून सुरु आहे. यात भारताची सुद्धा महत्वाची भूमिका आहे. एका प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय मीडियाकडून पडद्यामागे ज्या घडामोडी घडतायत, त्याची माहिती समोर आलीय.

Iran-US War Update : इराण-अमेरिकेला एका टेबलावर आणण्यासाठी पडद्यामागे भारताचाही महत्वाचा रोल! आंतरराष्ट्रीय मीडियाकडून खुलासा
Donald Trump-Mojtaba KhameneiImage Credit source: Reuters
| Updated on: Mar 24, 2026 | 8:41 AM
Share

मध्य पूर्वेत सुरु असलेलं युद्ध रोखण्यासाठी पडद्यामागे जगातील मोठ्या शक्ती सक्रीय झाल्या आहेत. ट्रम्प यांनी काल, पुढचे पाच दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले न करण्याची घोषणा केली. त्याच्याआधी तुर्की आणि ओमानच्या माध्यमातून सक्रीय बॅकचॅनल चर्चा सुरु होत्या. एका वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्ट्नुसार आधीपासून मध्यस्थाची भूमिका बजावणारा ओमान पुन्हा एकदा दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी देशांना टेबलावर आणण्याचं माध्यम बनला आहे. रिपोर्टनुसार तुर्की, ओमानच नाही तर भारत, सौदी अरेबिया आणि इजिप्तच्या माध्यमातून सतत कूटनीतिक संदेशांचं आदान-प्रदान सुरु होतं.

भारताचे इराण आणि अमेरिका दोघांसोबत चांगले संबंध आहेत. नवी दिल्लीने क्षेत्रीय स्थिरतेसाठी संवादाचा मार्ग खुला ठेवण्यासाठी मदत केली. ट्रम्प यांनी पाच दिवसांसाठी युद्ध विरामाची घोषणा केली, त्यावर या गुप्तचर्चेचा कितपत प्रभाव पडला या बद्दल स्पष्टता नाहीय. कूटनीतीक एक्सपर्ट्सनुसार, या देशांचा दबाव आणि मध्यस्थतेने युद्धाचा फैलाव रोखण्यासाठी ‘सिक्योरिटी वाल्व’ सारख काम केलय.

युद्धाचा हा चौथा आठवडा

सद्य स्थितीत एकाबाजूला सैन्य तणाव आहे. दुसरीकडे अनेक देश पडद्यामागे संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. युद्धाचा हा चौथा आठवडा आहे. प्रथमच इतके सारे देश अमेरिका आणि इराणमधील मतभेद कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. येणाऱ्या दिवसात या युद्धावर कूटनितीक तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना अजून वेग येऊ शकतो असं संकेत मिळतायत.

याआधी अशी बातमी होती की, पाकिस्तान, तुर्की आणि इजिप्त पडद्यामागून दोन्ही देशांना चर्चेच्या टेबलावर आणण्याचे प्रयत्न करत आहेत. अमेरिकेकडून उपराष्ट्रपती जेडी वेन्स या बैठकीत सहभागी होऊ शकतात असाही दावा केला जातोय.

ट्रम्प यांच्या ब्रेकमागे तीन शक्यता काय?

डोनाल्ड ट्रम्प यांनी पाच दिवसांसाठी हा जो युद्ध ब्रेक घेतलाय, त्या संदर्भात वेगवेगळे दावे सुरु आहेत. तेलाच्या बाजारातील किंमती स्थिर ठेवण हा ट्रम्प यांचा एक उद्देश आहे. त्याशिवाय इराणवर मोठा हल्ला चढवण्यासाठी त्यांना अजून वेळ हवाय असही कारण दिलं जात आहे. या युद्धात अमेरिका फसल्याने त्याने सन्मानाने एक्झिट हवीय ही तिसरी शक्यता सुद्धा आहे.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक