AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explained : सगळ्यांना वाटतं ट्रम्प घाबरले, पण पुढचे 5 दिवस No Attack बोलण्यामागे अमेरिकेचा मोठा गेमप्लान, यू-टर्न उगाच नाही घेतला

भारत-पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूरच्यावेळी सुद्धा हे दिसून आलय. बॅक चॅनल जे काही सुरु होतं, त्याची घोषणा तेव्हाच झाली जेव्हा पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्कराला सांगितलं की, आम्हाला आता लढायचं नाही.

Explained : सगळ्यांना वाटतं ट्रम्प घाबरले, पण पुढचे 5 दिवस No Attack बोलण्यामागे अमेरिकेचा मोठा गेमप्लान, यू-टर्न उगाच नाही घेतला
US-Israel Image Credit source: PTI
| Updated on: Mar 23, 2026 | 10:42 PM
Share

अगदी दोन दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिलेली की, 48 तासात होर्मुज उघडलं नाही, तर इराणचे ऊर्जा प्रकल्प बरबाद करुन टाकीन. त्याच डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अचानक यू-टर्न घेतला. ते म्हणाले की, “इराणसोबत डीलसाठी चर्चा सुरु आहेत. माझी स्वत:ची इराणच्या नेत्यांसोबत फोनवर चर्चा झाली आहे” युद्ध कधीपर्यंत थांबणार या बद्दल ट्रम्प ठोस काहीच सांगत नाहीयत. त्यांनी पुढचे पाच दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करणार नाही असं सांगितलय. इराणने मात्र ट्रम्प यांचे हे दावे फेटाळून लावले आहेत. अशी कुठलीही चर्चा सुरु नसल्याचं इराणचं म्हणणं आहे. इराणी मिडिया ट्रम्प यांची खिल्ली उडवत आहे. काही चर्चा सुरु नसल्याचं इराणी मीडियाने म्हटलं आहे. इराण युद्ध सुरु झाल्यानंतर स्वत: ट्रम्प यांनी इतक्यावेळा पलटी मारली आहे की, खरं काय, खोटं काय हा लोकांच्या मनात प्रश्न आहे.

ट्रम्प आज अचानक असं का बोलतायत? हा प्रश्न निर्माण होतो. चर्चा सुरु जरी असली, तरी त्यांनी ती सार्वजनिक का केली?. इतकी घाई का केली?. सामान्यत: जेव्हा दोन देशांमध्ये युद्ध सुरु असतं, तेव्हा बॅक चॅनल चर्चा सुरु असते. पण जो पर्यंत कुठलीही घोषणा होत नाही, तो पर्यंत कुठलाही देश असा खुलासा करत नाही. युक्रेन युद्धात अमेरिका आणि युरोप अशा दोन पार्टी आहेत. युद्ध रोखण्यासाठी आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. युद्ध सुरु असताना बॅक चॅनल चर्चेची कुठलाही देश माहिती देत नाही.

ट्रम्प यांच्या अचानक यू-टर्न मागे तीन कारणं?

इराण युद्धात अमेरिका आणि इस्रायल हे दोन देश आहेत. अमेरिका म्हणतेय की इराण सोबत डीलवर त्यांची चर्चा सुरु आहे. इराण चूप आहे. इस्रायल सुद्धा यावर काही बोललेला नाही. इराणने या युद्धात आपले सुप्रीम लीडर तसच अनेक मोठ्या अधिकाऱ्यांना गमावलं आहे. इराण अशी डील का करेल? ज्यात त्यांच्यासाठी काही नाही. ट्रम्प तेलाच्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी सुद्धा असे दावे करत असावेत किंवा इराणवर नव्याने हल्ले चढवण्यासाठी त्यांना थोडा वेळ हवाय. या युद्धामुळे ट्रम्प यांच्यावर मायदेशात दबाव आहे तसेच युद्धाचा खर्च हे सुद्धा ट्रम्प यांच्या यू-टर्न मागे एक कारण असू शकतं.

अमेरिकेची अजून काय रणनिती असेल?

28 फेब्रुवारीला इराणवर हल्ला करण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या युद्धनौका इराण जवळच्या समुद्रात तैनात केल्या. दुसऱ्याबाजूला डीलसाठी त्यांची चर्चा चाललेली. डील होईल अशी शक्यता वाटत होती. त्याचवेळी अचानक अमेरिका-इस्रायलच्या फायटर जेट्सनी इराणवर हल्ला चढवला. आता ताज्या माहितीनुसार, USS बॉक्सर, USS पोर्टलँड, USS कॉमस्टॉक, USS न्यू ऑर्लियंस आणि USS त्रिपोली या युद्धनौका इराणच्या दिशेने जात आहेत. या काही सामान्य युद्धनौका नाहीत. या युद्धनौकांवर स्पेशल मरीन कमांडोज तैनात आहेत. जे कुठलही कठीण समुद्री ऑपरेशन्स करण्यासाठी सक्षम आहेत. इराणच्या ताब्यातील बेटं किंवा स्ट्रेट ऑफ हॉर्मुज सुरक्षित करण्यासाठी हे मरीन कमांडोज स्पेशल ऑपरेशन्स करु शकतात. ते इथे येईपर्यंत अमेरिकेच्या नौदलाला इराणकडून कुठलाही धोका निर्माण होऊ नये हा सुद्धा अमेरिकन रणनितीचा भाग असू शकतो.

Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन