AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Points Table : आरसीबीचा धमाका, विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप, मुंबईचं पॅकअप

IPL 2026 Points Table : गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबईवर थरारक विजय मिळवला. आरसीबीची मुंबईला पराभूत करण्याची 19 व्या मोसमातील ही दुसरी वेळ ठरली. मुंबईचं या पराभवासह 19 व्या हंगामातील आव्हान संपुष्टात आलं आहे.

IPL 2026 Points Table : आरसीबीचा धमाका, विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप, मुंबईचं पॅकअप
Rasikh Salam Dar RCB vs MIImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 11, 2026 | 7:25 AM
Share

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने रविवारी 10 मे रोजी डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात मुंबईवर मात करत 2 गुण मिळवले. आरसीबीचा हा आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील सातवा विजय ठरला. तिलक वर्मा याने केलेल्या 57 धावांच्या जोरावर मुंबईने आरसीबीसमोर 167 धावांचं आव्हान ठेवलं होतं. कृणाल पंड्या याने केलेल्या 73 धावांच्या मदतीने आरसीबीने 2 विकेट्सने सामना जिंकला. आरसीबीला शेवटच्या चेंडूवर विजयसाठी 2 धावांची गरज होती. त्यामुळे आरसीबी जिंकणार की मुंबई मैदान मारणार? याची उत्सूकता चाहत्यांना होती. तसेच 1 धाव झाली तर सुपर ओव्हरची शक्यता होती. त्यामुळे जिंकणार कोण? याची उत्सूकता शिगेला पोहचली होती. मात्र रसीख सलाम डार याने भुवनेश्वर कुमार याच्या मदतीने शेवटच्या चेंडूवर 2 धावा करुन आरसीबीला विजयी केलं.

आरसीबीचा 3 संघांना दे धक्का

आरसीबीने 1 चेंडूत 2 धावा करत 2 पॉइंट्सची कमाई केली. आरसीबीचा हा एकूण सातवा तर मुंबई विरुद्धचा दुसरा विजय ठरला. आरसीबीला या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. आरसीबीने मुंबईवर मात करुन पॉइंट्स टेबलमध्ये 3 स्थानांची झेप घेतली. आरसीबी यासह पॉइट्स टेबलमध्ये नंबर 1 टीम ठरली आहे. तर मुंबई इंडियन्सचं पराभवासह प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलं. मुंबई प्लेऑफमधून बाहेर होणारी दुसरी टीम ठरली. त्याआधी डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात चेन्नईने लखनौला पराभूत केलं. लखनौचं यासह पॅकअप झालं.

आरसीबी पुन्हा पहिल्या स्थानी

आरसीबीने मुंबईला पराभूत करुन सनरायजर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स या 3 संघांना मागे टाकत पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं. आरसीबी या सामन्याआधी चौथ्या स्थानी होती. मात्र एका विजयासह आरसीबी नंबर 1 ठरली. आरसीबी व्यतिरिक्त हैदराबाद आणि गुजरातचेही 14 गुण आहेत. मात्र आरसीबीचा नेट रनरेट सरस असल्याने त्यांनी पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 होण्याचा बहुमान मिळवला. या वरुन नेट रनरेटचं महत्त्व स्पष्ट होतं.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?

सोमवारी कुणाचा सामना?

दरम्यान सोमवारी 11 मे रोजी 19 व्या मोसमातील 55 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांची ही या मोसमातील आमनेसामने येण्याची दुसरी वेळ असणार आहे. पंजाबने गेल्या सामन्यात दिल्लीला पराभूत केलं होतं. त्यामुळे दिल्ली पंजाब विरुद्ध विजय मिळवून गेल्या पराभवाचा हिशोब करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे धर्मशालेतील एचपीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...