AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs DC Live Streaming : पंजाबला नंबर 1 होण्याची संधी, दिल्ली कॅपिट्ल्स हिशोब करणार?

Punjab Kings vs Delhi Capitals IPL 2026 Live Scorecard : पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स दोन्ही संघांची 19 व्या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. दिल्लीकडे हा सामना जिंकून गेल्या पराभवाचा हिशोब करण्याची संधी आहे.

PBKS vs DC Live Streaming : पंजाबला नंबर 1 होण्याची संधी, दिल्ली कॅपिट्ल्स हिशोब करणार?
PBKS vs DC IPL 2026 Preview Image Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 11, 2026 | 6:14 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 55 वा सामना हा पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ल कॅपिट्ल्स यांच्यात होणार आहे. पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स दोन्ही संघांची 19 व्या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. श्रेयस अय्यर याच्याकडे पंजाबच्या नेतृत्वाची धुरा आहे. तर अक्षर पटेल याच्या खांद्यावर दिल्लीच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. पंजाबला हा सामना जिंकून प्लेऑफच्या आणखी जवळ पोहचण्याची संधी आहे. तर दिल्लीकडे विजय मिळवून गेल्या पराभवाची परतफेड करण्यासह पंजाबला प्लेऑफपासून रोखण्याची संधी आहे. अशात या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे.

पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना कधी?

पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना सोमवारी 11 एप्रिलला होणार आहे.

पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना कुठे?

पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये होणार आहे.

पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना मोबाईलवर जियोहॉटस्टार एपद्वारे स्मार्ट टीव्ही,लॅपटॉप आणि मोबाईलवर पाहायला मिळेल.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यातील हा 36 वा सामना असणार आहे. याआधी दोन्ही संघांत झालेल्या 35 सामने झाले आहेत. एका सामन्याचा अपवाद वगळता दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. पंजाब किंग्सने 35 पैकी 18 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर दिल्ली कॅपिट्ल्सने 17 सामन्यांत पंजाबला पराभूत केलंय.

दिल्ली पराभवाचा बदला घेणार?

दरम्यान दिल्लीकडे हा सामना जिंकून पंजाब विरूद्धच्या गेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. दोन्ही संघात याआधी 25 एप्रिलला आमनेसामने आले होते. तेव्हा पंजाबने दिल्लीला 6 विकेट्सने पराभूत केलं होतं. आता दिल्ली त्या पराभवाचा हिशोब करुन पंजाबच्या अडचणीत वाढ करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...