AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जयंत पाटील यांनी आईची शपथ घेऊन सांगावं.., गोपीचंद पडळकर यांची जोरदार टीका

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना आव्हान दिले आहे की, "विशाल पाटील खासदार व्हावेत, असं तुम्हाला वाटत होतं का? आईची शपथ घेऊन सांगा." पाटलांच्या मुलाच्या राजकीय भवितव्यावरही त्यांनी टीका केली.

जयंत पाटील यांनी आईची शपथ घेऊन सांगावं.., गोपीचंद पडळकर यांची जोरदार टीका
Gopichand PadalkarImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 10, 2026 | 10:46 PM
Share

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. जयंतरावांनी आईची शपथ घेऊन सांगावं की विशाल पाटील खासदार व्हावेत, असं त्यांना वाटत होतं का? असं खुलं आव्हानच गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गोपीचंद पडळकर यांच्या या आव्हानावर जयंत पाटील काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, पडळकर यांच्या या खोचक टीकेमुळे येणाऱ्या काळात पाटील विरुद्ध पडळकर असा सामना रंगलेला पाहायला मिळणार असल्याचं चित्र दिसत आहे.

जयंत पाटलांनी त्यांच्या मुलासाठी प्रयत्न केला होता, हे तुम्हाला माहीत आहे ना? जर ते विशाल पाटलाला खासदार करू शकत असतील तर त्यांनी त्यांच्या मुलाला केला असतं ना? सगळ्या पोरांचं लॉन्चिंग झालं आहे. आर आर पाटील यांचे पोरग आमदार झालं याचं त्यांना आता सगळ्यात दुःख आहे. पण त्यांचं पोरगं काही आमदार होईना, याचचं सगळ्यात दुःख जयंत पाटील यांना आहे. सांगली आणि हातकणंगलेमध्ये त्यांच्या मुलांसाठी प्रयत्न करून बसलेत. विशाल पाटील खासदार व्हावं जयंत रावांची इच्छा आहे का? जयंतरावने आईची शपथ घेऊन सांगावं की विशाल पाटील खासदार व्हावं असे वाटत होतं का? अशी जोरदार टीका गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील याच्यावर केली आहे. ते सांगली मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री मार्ग काढतील

यावेळी गोपीचंद पडळकर यांना कांद्याच्या प्रश्नावर विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवलं. मुख्यमंत्री हे शेतकरी नेत्यांसोबत चर्चा करत आहेत. मी शेतकरी नेता माही. पण या सगळ्या विषयात कांद्याच्या भावाच्या संदर्भात मुख्यमंत्री केंद्र सरकारची चर्चा करून एक चांगला मार्ग काढतील, असा विश्वास पडळकर यांनी व्यक्त केला.

त्या गोष्टीला समर्थन

संग्राम जगताप हे हिंदू धर्माच्या रक्षणासाठी पुढे येऊन काम करतात. त्यांच्या पक्षाची विचारधारा जरी वेगळी असली तरी त्याचा विचार न करता, त्याची तमा न बाळगता अत्यंत झोकून देऊन ते काम करतात आणि अहिल्यानगर सारख्या शहरामध्ये ते काम करत आहेत. हा मुस्लिम एरिया आहे. ते मताचा विचार करत नाहीत. ते निवडणुकीचा विचार करत नाही. परंतु हिंदू धर्म टिकला पाहिजे, परंपरा टिकल्या पाहिजे. हिंदू मुलींच्या संदर्भात हायेस्ट तिथे तक्रारी आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर त्यांनी जो विषय पुढे आणलाय तो विषय अत्यंत अभ्यासपूर्ण पुढे आणलेला आहे. आणि त्यामुळे त्या गोष्टीला माझं समर्थन असल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?