AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक भोवली; मनसेला मोठा दणका, मोठी बातमी समोर

जालन्यातून मोठी बातमी समोर येत आहे, शनिवारी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती, या प्रकरणात आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मनसे कार्यकर्त्यांना हे प्रकरण चांगलंच भोवलं आहे.

गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक भोवली; मनसेला मोठा दणका, मोठी बातमी समोर
gunratna sadawarteImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 10, 2026 | 3:24 PM
Share

गुणरत्न सदावर्ते यांनी अनेकदा राज ठाकरे यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. ते सातत्याने राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेंवर जोरदार टीका करत असतात. दरम्यान शनिवारी या विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाल्याची पहायला मिळाली. शनिवारी गुणरत्न सदावर्ते जालन्याच्या दौऱ्यावर होते, यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाई फेक केली. तसेच त्यांच्या गाडीवर सुपारी देखील फेकण्यात आली. त्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे. मनसेकडून गाडीवर शाईफेक झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मनसे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर येत आहे. पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाई आणि सुपार्‍या फेकल्या प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मनसेचे जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह तिघांवर चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या फिर्यादीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कलम  126(2), सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत रस्ता अडवणे, अवैध पद्धतीने जमाव जमवून घोषणाबाजी करणे, त्याचसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करणे अशा विविध प्रकरणात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान आता या प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यात आहे.

शनिवारी दुपारी जालना शहरातल्या विशाल कॉर्नर परिसरात ही घटना घडली होती. मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत, गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाई तसचे सुपाऱ्या फेकल्या होत्या.  या घटनेनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मनसेवर गंभीर आरोप केले होते. या घटनेत जे द्रव्य फेकण्यात आले होते, त्यामध्ये केमिकल होते, त्यांचा मारण्याचा उद्देश होता का? असा सवाल यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता.  तसचे राज ठाकरे यांनी आपल्यासोबत वौचारिक चर्चा करावी असं थेट आव्हान देखील यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केलं होतं.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?