Rupali Chakankar | अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका ट्रस्टबाबत…
भोंदू अशोक खरातमुळे राज्याची अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रतिमा पार धुळीस मिळाली. अनेक महिलांचे लैंगिक शोषण, व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची त्याने मोठी फसवणूक केली आहे. कोट्यवधींचा अनेकांना गंडा घातला आहे.
भोंदू अशोक खरातमुळे राज्याची अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रतिमा पार धुळीस मिळाली. अनेक महिलांचे लैंगिक शोषण, व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची त्याने मोठी फसवणूक केली आहे. कोट्यवधींचा अनेकांना गंडा घातला आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यांची SIT चौकशीची मागणी करण्यात येत होती.
रुपाली चाकणकर या आज सकाळीच त्यांच्या वकिलांसह नाशिकमध्ये दाखल झाल्या होत्या. या आधी त्यांनी एसआयटी चौकशीला सामोरे जाणं टाळलं होतं. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या दोन तासांपासून रुपाली चाकणकर यांची चौकशी सुरु आहे.
या चौकशीदरम्यान खरात प्रकरणात नेमकं कोण कोण आहे, ते समोर येऊ शकते. इतकेच नाही तर अशोक खरातच्या फरार पत्नीचा थांगपत्ता लावण्यात मदत मिळू शकते. त्याशिवाय शिवनिका ट्रस्ट बाबत महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते.
Published on: May 10, 2026 03:51 PM
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...

