थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळालेले आठ नेते कोणते?
थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली असून . थलपती विजय यांच्यासह आठ नेते मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. हे नेते नेमके कोण असतील याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या कार्यक्रमाला विरोधीपक्ष नेते राहुल गांधी उपस्थित आहेत.
तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत मोठा विजय मिळवला असला, तरी सरकार स्थापनेचा मार्ग स्पष्ट झालेला नव्हता. बहुमताच्या आकड्यांमध्ये अडचण निर्माण झाल्यामुळे विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले होते. आता मात्र थलपती विजय यांचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. व्हिसीके पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती जोसेफ विजय यांना बहुमताचा आकडा गाठता आला आहे.
थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली असून. विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून राजेंद्र विश्वनाथ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. थलपती विजय यांच्यासह आठ नेते मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. हे नेते नेमके कोण असतील याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. थलपती जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पी. वेंकटरामनन, आर. निर्मलकुमार, राजमोहन आणि डॉ. टी. के. प्रभू यांनी तामिळनाडू राज्याचे मंत्री म्हणून शपथ घेतली. महत्त्वाची बाब म्हणजे या कार्यक्रमाला विरोधीपक्ष नेते राहुल गांधी उपस्थित आहेत.
बहुमत सिद्ध करण्यासाठी विजय थलपती आणि राज्यपाल यांच्यात वारंवार भेटीगाठी होताना दिसत होत्या. अलीकडेच मिळालेल्या माहितीनुसार, थलपती विजय यांना बहुमताचा आकडा मिळवण्यात यश आलं आहे.
Published on: May 10, 2026 10:34 AM
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...

