Eknath Shinde Dream Project | शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी रुपये खर्च अन्…
कोकणातून महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आणि प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा आधुनिक केबल स्टे ब्रिज आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या पुलामुळे कोकणातून महाबळेश्वरला जाण्याचा प्रवास सुमारे खूप जलद होणार आहे.
कोकणातून महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आणि प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा आधुनिक केबल स्टे ब्रिज आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या पुलामुळे कोकणातून महाबळेश्वरला जाण्याचा प्रवास सुमारे खूप जलद होणार आहे. हा मार्ग तयार झाल्यामुळे प्रवाशांचा भरपूर वेळ वाचेल, इतकेच नाही तर सुंदर प्रवासाचा आनंद घेता येईल.
सुमारे 175 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारला जाणारा हा पूल पश्चिम महाराष्ट्रातील पहिलाच केबल स्टे ब्रिज ठरणार आहे. पुलाची लांबी 540 मीटर आणि रुंदी 14 मीटर आहे.
या पुलाच्या मध्यभागी 43 मीटर उंच व्ह्यू गॅलरी तयार करण्यात आली आहे. पर्यटकांसाठी येथे कॅप्सूल लिफ्ट तसेच जिन्यांची सुविधा असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जाणारा हा पूल आता अंतिम टप्प्यात असून त्याचे सुमारे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. लवकरच हा पर्यटकांसाठी खुला केला जाणार आहे.
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..

