AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत डॉमिनोजवर एफडीएची कारवाई: तीन आउटलेटचे परवाने निलंबित

मुंबईत डॉमिनोजवर एफडीएची कारवाई: तीन आउटलेटचे परवाने निलंबित

| Updated on: Aug 13, 2026 | 1:23 PM
Share

मुंबईमध्ये एफडीएची डॉमिनोजवरती मोठी कारवाई बघायला मिळतेय. व्हेज-नॉनव्हेजसाठी एकच आउटलेट, डॉमिनोजचे तीन आउटलेटचे परवाने निलंबित झालेले आहेत. अस्वच्छता आणि इतर कारणांमुळे परवाना रद्द केलाय. एफडीएची मुंबईमध्ये १०४ ठिकाणी छापेमारी बघायला मिळाली आहे. विलेपार्ले, बोरीवली आणि घाटकोपर या ठिकाणच्या डॉमिनोजवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे . आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. तीन आउटलेटचे परवाने या […]

मुंबईमध्ये एफडीएची डॉमिनोजवरती मोठी कारवाई बघायला मिळतेय. व्हेज-नॉनव्हेजसाठी एकच आउटलेट, डॉमिनोजचे तीन आउटलेटचे परवाने निलंबित झालेले आहेत. अस्वच्छता आणि इतर कारणांमुळे परवाना रद्द केलाय. एफडीएची मुंबईमध्ये १०४ ठिकाणी छापेमारी बघायला मिळाली आहे. विलेपार्ले, बोरीवली आणि घाटकोपर या ठिकाणच्या डॉमिनोजवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे . आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. तीन आउटलेटचे परवाने या ठिकाणी निलंबित करण्यात आलेले आहेत. डॉमिनोजसारख्या मोठ्या ब्रँडवरती ही कारवाई आता करण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये डॉमिनोजवरती एफडीएने ही कारवाई केलेली आहे. तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये विलेपार्ले, बोरीवली आणि घाटकोपरमधल्या आउटलेटचा समावेश आहे. अन्नसुरक्षेच्या त्रुटी या ठिकाणी आढळलेल्या आहेत. अन्न आणि औषध प्रशासनानं राज्यामध्ये विशेष मोहीम सध्या सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण जर पाहिलं, तर आता डॉमिनोजवरती एफडीएने ही धाड टाकलेली आहे आणि विशेष कारवाई केलेली आहे. या ठिकाणी अस्वच्छता आढळलेली आहे. व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांसाठी एकच आउटलेट असल्याचं समोर आले असून  ही कारवाई करण्यात आलेली आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं राज्यात विशेष मोहीम राबवत १०४ आस्थापनांची तपासणी केली. अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भात त्रुटी आढळल्यानंतर कारवाई झालेली आहे. दोघांना व्यवसाय बंदीची नोटीस दिलेली आहे. आपण एकंदरीत जर बघितलं तर मुंबईमध्ये डॉमिनोजवरती एफडीएने ही कारवाई केली आणि तीन आउटलेट्सचे परवाने देखील निलंबित केलेले आहेत.  यामध्ये मुंबईमधल्या तीन डॉमिनोज पिझ्झा केंद्रांचाही समावेश आहे, ज्यामध्ये विलेपार्ले, बोरीवली, घाटकोपरमधील डॉमिनोजचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. शिवाय भांडुपमधील देखील दोन हॉटेलचे अन्न परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. डॉमिनोज पिझ्झाच्या विविध केंद्रांमध्ये अन्नसुरक्षा नियमांचं उल्लंघन आढळलेलं आहे.

Published on: Aug 13, 2026 01:23 PM

Follow Us