AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड

भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड

| Updated on: Aug 13, 2026 | 1:37 PM
Share

मांसाहार करणाऱ्यांना ताडदेव मधल्या गृहसंकुलामध्ये घर मिळणार नाही. अशी जाहिरात सोशल मीडियावरती दलाल भावेश कावरेने केली आहे आणि या प्रकरणी आता संताप व्यक्त केला जातोय बघूया. मुंबईत घर विक्रीतून दलाली कमावणाऱ्या भावेश कावरेच्या एका रीलमुळे राज्यात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटलाय. फ्लॅट चाहिये तो मिल जायेगा या वाक्यामुळे दलाल भावेश कावरे काही वर्षांपासून […]

मांसाहार करणाऱ्यांना ताडदेव मधल्या गृहसंकुलामध्ये घर मिळणार नाही. अशी जाहिरात सोशल मीडियावरती दलाल भावेश कावरेने केली आहे आणि या प्रकरणी आता संताप व्यक्त केला जातोय बघूया. मुंबईत घर विक्रीतून दलाली कमावणाऱ्या भावेश कावरेच्या एका रीलमुळे राज्यात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटलाय. फ्लॅट चाहिये तो मिल जायेगा या वाक्यामुळे दलाल भावेश कावरे काही वर्षांपासून सोशल मीडियावर स्टार झाला होता. त्याच्या युनिक रील्समुळे त्याच्या शैलीची चांगलीच चर्चा रंगली. मात्र आता त्यानं ताडदेवमधील एका गृहप्रकल्पाची केलेली जाहिरात ही वादात सापडली आहे. या जाहिरातीत दक्षिण मुंबईचा उल्लेखही साऊथ बॉम्बे असा करण्यात आलाय.

ये है पुरे साऊथ बॉम्बे का व्यू. यहांसे आपको सी व्यू भी देखने मिल जाता है. एक मिनिट 19 सेकंदांच्या या जाहिरातीमध्ये मांसाहार करणाऱ्यांना घर मिळणार नाही असं तब्बल दोन वेळा सांगण्यात आलंय. नॉनव्हेज खाते हो तो यहा पे घर नही मिलेगा. अगर आप प्युअर व्हेजिटेरियन हो तो स्क्रीन पे दिये नंबर पे कॉल करो. नॉनव्हेज खाते हो तो यहा पे घर नही मिलेगा. अगर आप प्युअर व्हेजिटेरियन हो तो स्क्रीन पे दिये नंबर पे कॉल करो. ताडदेव लोकेशन में तो स्क्रीन पे दिये नंबर पे कॉल करो और हा नॉनव्हेज खाते हो तो यहा पे घर नही मिलेगा. अगर आप व्हेजिटेरियन हो तो मोस्ट वेलकम. यावरून ठाकरेच्या शिवसेनेतले आमदार वरून सरदेसाई यांनी तर थेट दलाल कावरेला थेट ठोकण्याचा इशारा दिलाय. दलाल कावरेच्या रीलवरती सरदेसाईंनी कमेंट केलीये. असल्या जाहिराती करणाऱ्यांना दिसेल तिकडे ठोकलं पाहिजे असं वरूण सरदेसाई म्हणालेत. तर इतर राजकीय नेत्यांनीही कावरेच्या वक्तव्याचा निषेध करत संताप व्यक्त केलाय.

जो ब्रोकर आहे आमच्या ताडदेवच्या आता शिवसैनिकांना तो कळेलच. त्याचा समाचार तर नीट घेऊच. म्हणजे आता ब्रोकर लोकं पोट भरतात आणि त्यांना चरबी यायला लागली आहे का? म्हणजे आता गुजराती, मारवाडी किंवा जैन लोकांच्या जे कोणी बिल्डर आहेत त्यांची भाषा जर ब्रोकर पण बोलायला लागले असतील तर ब्रोकरचा आम्ही आता शोध घेऊ. व्हेजिटेरियन असेल तर तुमचं स्वागत आहे. नॉनव्हेज वाल्यांसाठी तुमचं स्वागत नाहीये. तर मला वाटतं ते गृहस्थ कोण आहे त्याचा समाचार घ्यावा लागेल. कळलं का? तो असा कुठल्या शासनाचा कायदा आहे की नॉनव्हेज वाल्यांना घर द्यायची नाहीत? हे त्यालाच मला आम्हाला विचारावं लागेल. लवकरच त्याचा आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलने समाचार घेऊ आम्ही. तर मराठी माणसांचा द्वेष करणाऱ्यांवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा. मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांची ही प्रतिक्रिया आहे. दलाल भावेश कावरेच्या जाहिरातीनंतर संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाही कावरेची वादग्रस्त जाहिरात आहे आणि त्याचवरती आता ही प्रतिक्रिया समोर आली आहे. या माजोरड्या मोजोर लोकांना जे महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला शाकाहारी असाल तरच घर दिली अशी अट ठेवणाऱ्या लोकांवरती कारवाई केली पाहिजे. मास, मासे, मटन खाणाऱ्या लोकांची हे शहर आहेत. मग तुम्ही इथे मुळात आलात कशाला? मराठीचा, महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा जो द्वेष करतोय यांच्यावरती सरसकट अॅट्रॉसिटीचे गुन्हे नोंद केले पाहिजे अशी आमची माननीय मुख्यमंत्र्यांकडे विनंती आहे.

Published on: Aug 13, 2026 01:37 PM

Follow Us