नीट परीक्षा आणि तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
नीट परीक्षेवरुन मनसे नेते अमित ठाकरे यांनी ट्वीट केलेलंय. तामिळनाडूत बारावीच्या गुणांवरच वैद्यकीय प्रवेश देण्याचा ठराव आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडून ठराव मान्य, मतभेद बाजूला ठेवत नेत्यांनी पाठिंबा दिला, असं अमित ठाकरेंनी म्हटलंय. महाराष्ट्रात समाजकारण उरलंच नाहीये, फक्त सत्ताकारण आणि दडपशाही सुरू. अमित ठाकरे यांचा सरकारवर निशाणा. तामिळनाडू राज्य सरकारने जो निर्णय घेतलाय, तोच निर्णय महाराष्ट्र सरकारने […]
नीट परीक्षेवरुन मनसे नेते अमित ठाकरे यांनी ट्वीट केलेलंय. तामिळनाडूत बारावीच्या गुणांवरच वैद्यकीय प्रवेश देण्याचा ठराव आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडून ठराव मान्य, मतभेद बाजूला ठेवत नेत्यांनी पाठिंबा दिला, असं अमित ठाकरेंनी म्हटलंय. महाराष्ट्रात समाजकारण उरलंच नाहीये, फक्त सत्ताकारण आणि दडपशाही सुरू. अमित ठाकरे यांचा सरकारवर निशाणा. तामिळनाडू राज्य सरकारने जो निर्णय घेतलाय, तोच निर्णय महाराष्ट्र सरकारने वर्षांपूर्वीच घ्यायला हवा होता. राज ठाकरेंनी २०१६ मध्येच ठणकावून सांगितलं होतं की, ‘नीट’ ही परीक्षाच मुळात निरुपयोगी आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि मराठी विद्यार्थ्यांचा बळी घेण्यासाठी ही परीक्षा आणली गेलीय. पण आपल्याकडे सत्ताधाऱ्यांना तेव्हाही कुणाचं ऐकायचं नव्हतं आणि आजही ऐकायचं नाहीये. महाराष्ट्रात समाजकारण उरलंच नाही, फक्त सत्ताकारणाचा आणि दडपशाहीचा खेळ सुरू आहे, असं जनतेला वाटू देऊ नका. सत्ताधाऱ्यांनी तामिळनाडूतून धडा घेत एकत्र येण्याची हिंमत दाखवा. कारण महाराष्ट्र आधी, राजकारण नंतर… असं अमित ठाकरेंनी ट्विट करत म्हटलंय.
Published on: Aug 13, 2026 01:35 PM
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईत डोमिनोजच्या तीन आउटलेटचे परवाने निलंबित

