रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले महत्त्वाचे मुद्दे
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर या नाशिकमध्ये दाखल झाल्या आहेत. थोड्याच वेळात त्या SIT समोर हजर होतील. भोंदू बाबा अशोख खरात प्रकरणात त्या एसआयटीसमोर हजर होत आहेत.
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर या नाशिकमध्ये दाखल झाल्या आहेत. थोड्याच वेळात त्या SIT समोर हजर होतील. भोंदू बाबा अशोख खरात प्रकरणात त्या एसआयटीसमोर हजर होत आहेत.
भोंदू अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. अनेकांना कोट्यवधींना गंडा घातला. तर अनेकांच्या जमिनी हडपल्या. याप्रकरणात राजकीय कनेक्शन उघड झाल्यानंतर काही नेत्यांवर मोठे आरोप झाले. शिवनिका ट्रस्टच्या माध्यमातून काहींचे थेट खरातशी लागेबंध समोर आले. त्यांच्या चौकशीची सातत्याने मागणी होत होती.
एकट्या रुपाली चाकणकरांची चौकशी व्हावी अशी विनंती एसआयटी आणि तर एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे केल्याची माहिती दमानिया यांनी दिली. त्यांच्या व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे. रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या हे सुद्धा समोर आलं पाहिजे अशी मागणी दमानिया यांनी केली.
Published on: May 10, 2026 12:49 PM
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...

