सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका, गाडी गुजरातची अन्…
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या मुंबईहून पुणे प्रवास करत होत्या, त्यावेळी त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. मुंबई-पुणे मार्गावरून प्रवास करताना एका गाडीने त्यांच्या कारला बाजूने जोरदार धडक दिली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या मुंबईहून पुणे प्रवास करत होत्या, त्यावेळी त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. मुंबई-पुणे मार्गावरून प्रवास करताना एका गाडीने त्यांच्या कारला बाजूने जोरदार धडक दिली. यानंतर गाडीतील सर्वजण सुखरूप आहेत, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. मात्र, रस्त्यावर वाहन चालवताना काळजी घ्या, असं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते सुनील माने यांनी एक शंका व्यक्त केली आहे.
सुनील माने म्हणाले, सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीतील महत्त्वाच्या नेत्या आहेत. अलीकडे एका पाठोपाठ एक राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे. अजित दादांच्या अपघाती मृत्यूचं कारण अजूनही उलगडलं नाही, त्यात सुप्रिया ताईंच्या गाडीचा अपघात झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे, ही गाडी गुजरातची असून या प्रकरणाला साधारण अपघात न समजता सखोल तपास झाला पाहिजे.
Published on: May 10, 2026 11:37 AM
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा

