Sanjay Raut | लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत; राऊतांचा शिंदे सेनेवर हल्लाबोल
साताऱ्यातील मारहाण प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. पालकमंत्री शंभुराज देसाई यांना रस्त्यावर मारहाण झाल्याचा आरोप असून, या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार आक्रमक झाले. त्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
साताऱ्यातील मारहाण प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. पालकमंत्री शंभुराज देसाई यांना रस्त्यावर मारहाण झाल्याचा आरोप असून, या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार आक्रमक झाले. त्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा लोकशाहीचा खून झाला आणि पोलिसांकडून झुंडशाही झाली, त्याचा केंद्रबिंदू विधिमंडळच राहिला असल्याचा आरोप त्यांनी केला. केवळ छाती आपटून आंदोलन करून काहीही साध्य होणार नाही, असा सवाल उपस्थित करत राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “ मुळात जे लोकशाहीचा खून झाला असे म्हणत आहेत त्यांचेच हात लोकशाहीच्या खुनाने रंगले आहेत ,” असे वक्तव्य करत त्यांनी नाव न घेता सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तसेच, सातारच्या घटनेचा उल्लेख करत राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. “वाघाची कातडं पांघरलेल्या शिवसैनिकांना भाजपच्या मंत्र्यांनी रस्त्यावर मारहाण केली, मग तेव्हा तुमच्यातला शिवसैनिक कुठे गेला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Published on: Mar 24, 2026 12:14 PM
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...

