पायल रोहतगी पुन्हा वादात अडकली, पुणे पोलिसांनी दाखल केला गुन्हा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

प्रसिद्ध अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi ) पुन्हा एकदा वादात अडकली आहे. अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी अभिनेत्री पायल रोहतगी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पायल रोहतगी पुन्हा वादात अडकली, पुणे पोलिसांनी दाखल केला गुन्हा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
पायल रोहतगी
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 2:10 PM

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi ) पुन्हा एकदा वादात अडकली आहे. अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी अभिनेत्री पायल रोहतगी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्रीवर आता असा आरोप लावण्यात आला आहे की, सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून तिने देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे.

अभिनेत्री पायल रोहतगी वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य करून तिने असे अनेक वाद ओढवून घेतले आहेत. आता पोलिसांनी असा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवल्याबद्दल पायल रोहतगी तसेच अन्य अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

अभिनेत्रीविरोधात कलम 153 (A), 500, IPC 505 (2) आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्रीवर सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह व्हिडीओ शेअर करण्याचा आरोप करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह शब्द वापरले गेले आहेत.

अभिनेत्री विरुद्ध पोलिसांना मिळालेल्या तक्रारीमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, अभिनेत्री पायल रोहतगीने राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात अपमानास्पद व्हिडीओ बनवला आहे.

एवढेच नाही, तर अभिनेत्रीने हा व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रसारित केला आहे. असेही म्हटले गेले आहे की, सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे दोन समाजांमध्ये द्वेष निर्माण होऊ शकतो.

पायल रोहतगी गांधी कुटुंबाविरोधात काही बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही 2019 मध्ये राजस्थान पोलिसांनी मोतीलाल नेहरू यांच्याविरोधात आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी पायलवर गुन्हा दाखल केला होता.

कोण आहे पायल रोहतगी?

अभिनेत्री पायल रोहतगीने 2002 मध्ये रिलीज झालेल्या ‘ये क्या हो रहा है’ या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटानंतर, ती 2006 मध्ये ‘36 चायना टाऊन’मध्येही दिसली. चाहत्यांनी पायलला बिग बॉसमध्येही पाहिले आहे.

ट्विटरने पायलचं अकाऊंट केलं बंद

पायलनं कास्टिंग काउचबद्दलही अनेक खुलासे केले होते. बंगालमधील निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचारावर पायलनं पोस्ट शेअर केली होती. तसेच, कंगनाचं ट्विटर अकाउंट बंद केल्यावर पायलनं अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर ट्विटरनं आपत्तिजनक पोस्ट शेअर केल्यामुळे तिचं अकाऊंटही बंद केलं होतं.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही केले वक्तव्य

पायल रोहतगीनं चर्चेत येण्याची कोणतीही संधी सोडली नाही. सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर ती अनेक महिने टीव्हीवर झळकत होती. सुशांत प्रकरणात ती बॉलिवूड तज्ज्ञ म्हणून चर्चेत भाग घ्यायची. तिनंही भाजपच्या बाजूनं बोलण्यास सुरुवात केली होती. अनेक वेळा पंतप्रधान मोदी आणि अन्य भाजप नेत्यांच्या समर्थनार्थ ती खुलेआम भाष्य करत होती. यानंतर ती राजकारणात तर येणार नाही ना अशा चर्चा देखील रंगल्या होत्या.

हेही वाचा :

‘चला हवा येऊ द्या’ फेम ‘या’ अभिनेत्रीची ऐतिहासिक ‘रावरंभा’ चित्रपटात वर्णी, आता मोठ्या पडद्यावर दाखवणार अभिनयाची जादू!

अभिनेत्री सायरा बानो यांची तब्येत बिघडली, मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.