अभिनेत्री सायरा बानो यांची तब्येत बिघडली, मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल

दिवंगत अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानो (Saira Banu) यांची तब्येत अचानक खालावली आहे. सायरा बानो यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीच्या अहवालानुसार त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अभिनेत्री सायरा बानो यांची तब्येत बिघडली, मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल
सायरा बानो

मुंबई : दिवंगत अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानो (Saira Banu) यांची तब्येत अचानक खालावली आहे. सायरा बानो यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीच्या अहवालानुसार त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना नेमकं काय झालं हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांचे पती अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले होते. दिलीप साहेबांच्या जाण्याने सायरा बानो एकाकी झाल्या होत्या. अशातच आता त्यांची तब्येत बिघडल्याने चाहते देखील काळजीत पडले आहेत.

दिलीप कुमार यांच्या मृत्यूने सायरा बानो पूर्णपणे खचल्या होत्या. अभिनेत्याच्या अंत्यदर्शनाची काही छायाचित्रे समोर आली होती, जी खूप भावनिक होती. या फोटोंमध्ये अभिनेत्री सायरा पती दिलीप कुमार यांच्या पार्थिवाला शेवटच बिलगून धायमोकलून रडताना दिसल्या होत्या. मात्र, आता त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं म्हणून चाहते प्रार्थना करत आहेत.

वयाच्या 17 व्या वर्षी सायरा बानो यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी 1961 मध्ये शम्मी कपूरसोबत ‘जंगली’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी या चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू अशा प्रकारे पसरवली की, त्यांची प्रतिमा रोमँटिक नायिकेची बनली. या चित्रपटासाठी सायराला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले होते.

दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची प्रेमकथा

दिलीप आणि सायरा बानो यांच्या वयात 22 वर्षांचे अंतर होते. परंतु, त्यांच्या प्रेमामुळे कधीही हे अंतर त्यांच्या नात्याच्या मधे येऊ शकले नाही. सायरा नेहमीच दिलीपकुमार यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यांनी नेहमीच सिद्ध केले त्यांचे एकमेकांवरचे प्रेम खरे होते.

दिलीपकुमार यांचा ‘मुगल-ए-आजम’ हा चित्रपट 1960मध्ये मुंबईच्या प्रसिद्ध मराठा मंदिरात रिलीज झाला. तेव्हा अवघ्या 16 वर्षांच्या सायरा बानो आपल्या आवडत्या नायकाला पाहण्यासाठी तिथे गेल्या होत्या. पण तिथे गेल्यानंतर सायराजींचे हृदय तुटले. कारण दिलीप कुमार त्या प्रीमियरमध्ये आलेच नव्हते. सायराला याबद्दल खूप वाईट वाटले. तथापि, त्यानंतर त्यांनी स्वतः हिंदी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर एकदा सायराजींची दिलीप साहेबांशी भेट झाली. त्यावेळी सायराजी दिलीप कुमारांवरून आपली नजर हटवू शकल्या नाहीत.

सायराजींच्या आईचा हट्ट

शम्मी कपूरबरोबर ‘जंगली’ या चित्रपटात काम केल्यानंतर सायराच्या राजेंद्र कुमारसोबत डेटिंगच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या. यानंतर सायराजींच्या आई नसीम बानो दिलीप कुमार यांना भेटल्या आणि म्हणाल्या की, सायराशी याबद्दल बोला आणि तिला समजावून सांगा. त्यांच्या रिलेशनशिपच्या बातमीने सायराच्या आई खूश नव्हत्या आणि त्यांनी ही गोष्ट थांबवावी, अशी त्यांची इच्छा होती. सायराजींच्या आई या दोघांच्या नात्यामधील दुवा होत्या.

सायराजींच्या आईने दिलीप कुमार यांना सायराशी लग्न करण्यास सांगितले होते. परंतु, वयाचे अंतर लक्षात घेता दिलीप कुमार या लग्नासाठी तयार नव्हते. पण, सायराला नेहमीच दिलीप कुमारांशी लग्न करायचं होतं. दिलीपकुमार यांनी सायराला सांगितले की, तुला माझे पांढरे केस दिसत नाहीत का? पण सायराला काही फरक पडला नाही.

सायराजींना पाहून घायाळ झाले दिलीप कुमार

एकदा दिलीप कुमार सायरा बानो यांच्या घरी गेले होते. त्यावेळी साडी नेसलेल्या सायरा खूपच सुंदर दिसत होत्या. दिलीप कुमार त्यांना पाहून हरवून गेले आणि त्यांनी सायराजींना सांगितले की, त्या खूप क्यूट दिसत आहेत. यानंतर दुसर्‍या दिवशी दिलीपकुमार यांनी त्यांना पुन्हा फोन केला आणि सांगितले की, जेवण खूप चांगले झाले होते. यानंतर दिलीप कुमार सायराजींना सतत भेटू लागले. यानंतर दिलीप कुमारांनी सायरा बानो यांना प्रपोज केले. 1966मध्ये दिलीप कुमार यांनी सायरा बानो यांच्याशी लग्न केले. त्यांच्या लग्नाची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता. लग्नाच्या वेळी सायराजींचे वय 22 आणि दिलीप कुमारांचे वय 44 होते. मात्र, त्यांनी शेवट पर्यंत दिलीप कुमार यांची साथ सोडली नाही.

हेही वाचा :

श्रुती मराठेचा हटके ‘बॉर्बी डॉल’ लूक पाहिला का?; फोटो पाहून फॅन्स म्हणाले…

अरुंधती पुन्हा देशमुखांचं घर सोडणार की ‘समृद्धी’तच नांदणार? ‘आई कुठे काय करते’ मालिकेत येणार नवा ट्वीस्ट!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI